mumbai train 
मुंबई

पहिल्याच दिवशी तब्बल 'इतक्या' मुंबईकरांनी केला लोकलनं प्रवास, जाणून घ्या

सकाळवृत्तसेवा

मुंबई : गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेली मुंबईची लाईफलाईन उपनगरी रेल्वेसेवा सोमवारपासून पुन्हा रुळावर आली आहे. सोमवारी पहाटे साडे पाच वाजता चर्चगेटहून विरारसाठी पहिली लोकल रवाना झाली. राज्य सरकारअंतर्गत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच ही लोकल सेवा सुरू झाली. लोकल सुरू झाल्यानं अनेक प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. सुमारे अडीच महिन्यानंतर सुरू झालेल्या लोकलमधून पहिल्या दिवाशी 50 हजारांपेक्षा अधिक प्रवाशांनी प्रवास केला. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू झालेल्या लोकलमधील प्रवाशांच्या रेल्वेपासाला मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

पश्चिम रेल्वेवर पहिल्या दिवशी सुमारे 30 हजार प्रवाशांनी प्रवास केला. सोमवारी उपनगरी रेल्वेच्या चर्चगेट ते डहाणू रोड स्थानकांतील एकूण 56 तिकिट खिडक्यांमधून 3,521 तिकिटांची विक्री झाली. 1,466 प्रवाशांनी नवीन पास घेत प्रवास केला, तर 190 प्रवाशांच्या पासला मुदतवाढ देण्यात आली. यात सहामाही आणि वार्षिक पास असलेल्या प्रवाशांचा देखील समावेश असल्याचं पश्चिम रेल्वेनं स्पष्ट केले. मध्य आणि हार्बर रेल्वे स्थानकातील 41 तिकिट खिडक्यांवरून 12 हजार तिकिटांची विक्री झाली. पहिल्या दिवशी मध्य रेल्वेवर सुमारे 20 हजार प्रवाशांनी प्रवास केला. रेल्वे मंडळाच्या आदेशानुसार पासला मुदतवाढ देण्यात आली आहे, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

रेल्वे स्थानकांवर चोख बंदोबस्त 

रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या तपासणीसाठी सुमारे 1,250 जवान तैनात करण्यात आले होते. सर्व रेल्वे स्थानकांवर कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता. जवळपास 550 तिकीट तपासणीस ही स्थानकांत नियुक्त करण्यात आले.  लॉकडाऊनमुळं लोकल बंद असल्यानं जितके दिवस प्रवाशांना प्रवास करता आला नाही. त्या दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वे मंडळाने घेतला आहे. यासाठी नवीन पास प्रवाशांना देण्यात येईल. हा पास संबंधित रेल्वे स्थानकातील तिकिट खिडक्यांवरून प्रवाशांना मिळेल. हे केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी असेल.सर्व रेल्वे स्थानकांवर कडेकोट बंदोबस्त करण्यात आल्याने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन व्यवस्थित करण्यात आले होते, असा दावा रेल्वे अधिकाऱ्यांनी केला आहे.

अशी असेल ई पासची सुविधा 

या कर्मचाऱ्यांना प्रवास करण्यासाठी क्यूआर कोड आधारित ई पास सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल. मुंबई पोलिसांसाठी सध्‍या उपलब्‍ध असलेल्‍या याप्रकारच्‍या प्रणालीवर ती आधारलेली असेल. येत्‍या 3 ते 4 दिवसांमध्‍ये ही प्रणाली उपलब्‍ध होईल. तोपर्यंत संबंधितांचे ओळखपत्र ग्राह्य़ मानून तूर्त प्रवास करता येईल. ई पास सुविधा उपलब्‍ध झाल्‍यानंतर सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्‍यक ती माहिती भरुन पास तयार करुन घ्‍यावेत. तसंच कार्यालयांच्‍या आणि कामांच्‍या वेळा सुनिश्चित असल्‍यानं रेल्‍वेनं त्‍यानुसार वेळापत्रक तयार केलं असल्यानं त्‍याची माहिती कर्मचाऱ्यांना करुन द्यावी.

On the first day, so many Mumbaikars traveled by local read full story

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

Stock market News : ‘MRF’ स्टॉकशी पुन्हा बरोबरी केली ‘या’ शेअरने! ; 3 रुपयांवरून थेट 300000 पर्यंत वाढली होती किंमत अन् आता...

राम कपूरच्या 'मिस्त्री' मध्ये झळकतोय मराठमोळा अभिनेता; मराठीत दिलाय कोट्यवधींचा सिनेमा

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Thane News: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून विद्यार्थी पडले, दोन मुले गंभीर जखमी; ठाण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT