मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (Corona) शालेय शिक्षण विभागाने (Education Section) सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी पहिली ते बारावीपर्यंतचा एकूण 25 टक्के अभ्यासक्रम (syllabus) कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी ज्या पाठ्यक्रमातील भाग वगळण्यात आले होते तेच भाग यंदाही वगळण्यात आले असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली. ( First to twelve standard some syllabus deleting decision by School education department-nss91)
कोरोनामुळे यंदा शैक्षणिक वर्षाची सुरुवात 15 जूनपासून सुरु झाली असली तरी सर्वच शाळा मात्र प्रत्यक्षात सुरू झाल्या नव्हत्या. त्यात आता सध्या कोरोनामुक्त गावांमध्ये आठवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या असल्या तरी अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे पाठ्यक्रम वेळेत पूर्ण करणे यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकणार असल्याने राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांचा अभ्यासक्रम कमी करण्यात आला असल्याची माहिती शालेय शिक्षण सहसचिव राजेद्र पवार यांनी दिली.
शिक्षण विभागाकडून सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी पहिली ते बारावी पर्यंत चा 25 टक्के पाठ्यक्रम कमी करण्यासाठी मान्यता देण्यात आलेले आहे. यासाठीची इत्यंभूत माहिती राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद, पुणे यांच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही सर्व माहिती ही शाळा, विद्यार्थी, पालक आदींना अवगत होतील, यासाठीची प्रसिद्धी देण्याचे आदेशही शालेय शिक्षण विभागाने आज देण्यात आले आहेत.
मागील वर्षीप्रमाणेच कपात...
कोरोनाचा प्रादुर्भाव, सद्य:स्थितीत कमी झालेला दिसून येत नाही, त्याच पार्श्वभूमीवर मागील वर्षी जो अभ्यासक्रम कमी करण्यात आला होता तोच अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षात कमी करण्यात आला आहे. त्यात कोणताही बदल करण्यात आला नसल्याचेही सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.