संग्रहित  
मुंबई

ऐन लग्नसराईत फुले स्वस्त 

सकाळ वृत्तसेवा

रोहा : हळदीकुंकू कार्यक्रमांची मुदत संपताच शनिवारपासून (ता.1) फुलांचे बाजारभाव कोसळायला सुरुवात झाली. 4 दिवसांत फुले 50 टक्‍क्‍यांनी स्वस्त झाली आहेत. आवक वाढल्याने ऐन लग्नसराईत फुले स्वस्त झाल्याने ग्राहकांकडून मागणी वाढली आहे.

जानेवारीत मकर संक्रांत ते रथसप्तमीपर्यंत घरोघरी हळदीकुंकू साजरे झाल्याने फुलांना चांगली मागणी होती. शनिवारी (ता. 1) रथसप्तमी होताच हळदीकुंकवाच्या कार्यक्रमांची सांगता झाली. त्यामुळे फुलांची मागणी घटली. पुणे, सांगली, सातारा व कर्नाटक भागातून फुलांची आवक चांगली होत असल्याने मुंबई व पुणे बाजारात फुलांचे भाव 50 टक्‍क्‍यांनी कोसळले आहेत. 

शनिवारी घाऊक बाजारात झेंडूची फुले 40 ते 50 रुपये किलोने विकण्यात आली होती. हीच झेंडूची फुले आता 20 रुपये किलोने विकण्यात येत आहेत. शनिवारी शेवंतीची फुले 100 ते 120 रुपये प्रति किलोने विकली गेली होती; तर बुधवारी 60 रुपये प्रति किलोने विकण्यात आली. बिजलीची फुलेही शनिवारी 60 रुपये प्रति किलोने विकली गेली होती. ती बुधवारी 30 रुपये प्रति किलोने विकली जात होती.

शनिवारी 160 रुपये किलोने विकली गेलेली गुलछडीची फुले आज 100 रुपये किलोने विकली जात होती. शनिवारी मोगऱ्याचा प्रति किलोचा भाव 1 हजार 200 रुपये होता. तो बुधवारी 400 रुपयांनी कमी होऊन 800 रुपये प्रतिकिलो झाला होता. चायनीज गुलाबाच्या 20 फुलांच्या जुडीची किंमत शनिवारी 120 रुपये होती. बुधवारी ही जुडी 80 ते 100 रुपये किमतीला होती. 

पुणे, सांगली, नाशिक भागात फुलांसाठी पोषक वातावरण असल्याने उत्पादन चांगले येत आहे. बाजारात आवक वाढली आहे; तर फुलांची मागणीही घटली आहे. त्यामुळे फुलांचे भाव 30 ते 50 टक्‍क्‍यांनी घसरले आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारातही फुले स्वस्त झाली आहेत. हार व गजऱ्यांच्या किमतीही घटल्या आहेत. 
- किसन जाधव, विक्रेते 

मकर संक्रांत ते रथसप्तमीपर्यंत चालणाऱ्या हळदीकुंकू कार्यक्रमामुळे फुलांना चांगली मागणी होती. मात्र शनिवारपासून मागणी घटली. त्यानंतर आवक वाढल्याने फुलांच्या किमती 30 ते 50 टक्‍क्‍यांनी घसरल्या आहेत. आवक चांगली राहिल्यास किमती स्थिर राहतील. 
- मधुकर मालुसरे, फूलविक्रेते, कोलाड 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vat Purnima 2026 : सात जन्मच काय; पण एक क्षणही पत्नी नको! पत्नी पीडितांची आगळीवेगळी 'पिंपळ पौर्णिमा', झाडाला घातल्या 108 उलट्या प्रदक्षिणा

Thane News : आता ऑपरेशन टायगर- ३? ठाकरेंचे १४ आमदार फोडण्याची तयारी, ८ जुलैला पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता

Latest Marathi News Live Update : अमरावतीमधील बडनेरा रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण, तरीही लोकार्पण रखडले

Solapur: आषाढीसाठी १० जुलैपासून व्हीआयपी दर्शन बंद, मंदिर परिसरात ‘नो व्हेईकल झोन’; स्वच्छता, आरोग्य, वाहतूक सुविधांवर भर

Vat Purnima : आज वटपौर्णिमा; सकाळी ६ ते १०.३० हा पूजेसाठी उत्तम कालावधी, दुपारी १२.०८ ते १२.५९ या वेळेतही करता येईल पूजा; भद्रा काळ वर्ज्य नाही

SCROLL FOR NEXT