मुंबई

एवढं करा, म्हणजे लॉकडाऊनची वेळ येणार नाही; स्वतः अतिरिक्त आयुक्तांनी केलं स्पष्ट

समीर सुर्वे

मुंबई, ता.4 : कोविडचे रुग्ण वाढत आहेत. मात्र, नागरीकांनी नियमांचे पालन केल्यास मुंबईत लॉकडाऊन लावण्याची वेळ येणार नाही. मुंबई महापालिकेचे पालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी याबाबत माहिती दिली आहे. 23 महानगरपालिका आणि 16 खासगी रुग्णालयात आज लसिकरणाची परवानगी देण्यात आली आहे, असेही काकाणी यांनी सांगितले.

मुंबईत 97-98 टक्के रुग्ण हे इमारतींमधील आहेत, फक्त दोन ते तीन टक्के रुग्ण दाटीवाटीच्या वस्तीतील आहेत. पुर्व आणि पश्‍चिम उपनगरातील काही प्रभागांनी भेटीही दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेच्या 23 आणि 16 खासगी रुग्णालयांनी आज लसिकरणाची परवानगी दिली आहे. ही परवानगी देताना मोफत लसिकरण आणि सशुल्क लसिकरण अशी विभागणी केली आहे. जेणेकरून नागरीकांमध्ये गोंधळ होणार नाही असेही काकाणी यांनी नमुद केले. मुंबईतील रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र,नागरीकांनी मास्क वापरणे, सुरक्षीत अंतर राखणे आणि वैयक्तीक स्वच्छता राखणे असे नियम पाळल्यास लॉकडाऊनची वेळ येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारने 24 तास कोविड लसिकरणाची सोय उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली आहे. मात्र, मुंबईत तुर्तास तरी ही सुविधा उपलब्ध होणार नाही. सध्या असा कोणताही विचार नसल्याचे पालिकच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

लसिकरण केंद्रावर गर्दी होत असल्याने नागरीकांनी नोंदणी करुनच लसिकरण करण्यासाठी जावे. तसेच, केंद्रांवरही नोंदणीची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे असेही काकाणी यांनी सांगितले.

follow all lockdown rules wear mask use sanitizer and follow social distancing says additional commissioner of mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गणेशोत्सवाची आठवडाभर सुट्टी; मात्र गुजराती, कॉन्व्हेंट शाळांचा सुट्टी देण्यास नकार, शिक्षण विभागाचे कारवाईचे संकेत

'ठरलं तर मग' मालिका अर्जुन सुभेदार सोडणार? अमित भानुशाली पात्राबद्दल बोलताना म्हणाला, 'आता वेळ आलीय, मी आयुष्यभर...'

Weekly Horoscope September 2026 : सप्टेंबर १४ ते २० दरम्यान ‘या’ ५ राशींसाठी लॉटरी; नशिबाची जोरदार साथ मिळणार

Marathi News Live Updates : तिसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडीचा फटका; माणगाव-इंदापूर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा

Amravati Jail news : आठवड्याभरात तिसऱ्या बंदीचा मृत्यू ;जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील घटनेमुळे खळबळ

SCROLL FOR NEXT