water drown 
मुंबई

अरे बापरे..! वसईत चार वर्षांच्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू...

वृत्तसंस्था

मुंबई : तीन दिवसांपूर्वीच मालाड येथील मार्वे समुद्रात दोन मुले बुडाल्याची घटना ताजी असतानाच त्यानंतर आता वसईतील तलावामध्ये मंगळवारी दुपारी साडेचार वर्षांचा मुलगा बुडाल्याची घटना घडली. डावीक मितीना असे मृत मुलाचं नाव आहे. 

शेजाऱ्यांनी सांगितले की, मुलाच्या घराजवळ असलेल्या शेतात एक लहान तलाव आहे. तो त्या तलावाजवळ खेळत होता. जेव्हा मुलगा घरी परतला नाही, तेव्हा त्याची आई त्याला शोधण्यासाठी गेली. शोध घेत असताना त्याची आई तलावाजवळ आली आणि तेव्हा तिला तिच्या मुलाचा मृतदेह तलावामध्ये तरंगताना दिसला.

त्याच्या शेजारी राहणारा साहिल डगळे यांनी सांगितलं की, त्याची आई मुलाचा मृतदेह आपल्या हातातून घेऊन जात होती. तो काही हालचाल करत नव्हता आणि त्याचे कपडेही भिजले होते. आम्ही त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले पण डॉक्टरांनी त्याल मृत घोषित केलं. मात्र तोपर्यंत पोलिस पोहोचलेले नव्हते. 

वसई विरार शहर महानगरपालिकेत (VVCMC)ड्रायव्हर म्हणून काम करणारे मुलाचे वडील कमलेश यांना याबाबतची काहीच कल्पना नव्हती. जेव्हा त्यांना आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी समजली त्यांना धक्काच बसला. मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नवघर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे.

मार्वे चौपाटीवर दोन मुले बुडाली
तीन दिवसांपूर्वीच मालाड येथील मार्वे समुद्रात दोन मुले बुडाली. यातील एका मुलाचे वय 16 असून दुसऱ्याचे वय 13 आहे. ही दोन्ही मुले मालाडच्या मालवणी परिसरात राहणारी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT