fraud claiming police bike theft accused arrest mumbai sakal
मुंबई

Mumbai News : पोलीस असल्याचं सांगत केली फसवणूक

कोळसेवाडी पोलिसांनी तीन तासात ठोकल्या बेड्या

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : पोलिस असल्याची बतावणी करत दुचाकी स्वाराला अडवून त्याला अकराशे रुपये दंड वसुल करावा लागेल अशी बतावणी केली. त्यानंतर त्याला पोलिस चौकीत याव लागेल अशी बतावणी करत अर्ध्या रस्त्यात त्याला सोडून त्याची दुचाकी घेऊन दोघे भामटे पसार झाल्याची घटना कल्याणमध्ये घडले.

याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तीन तासात तोतया पोलिस दिलीप पाटील (वय 37) याला बेड्या ठोकल्या आहेत. दिलीप हा पूर्वी उल्हासनगर येथे ट्रॅफिक वॉर्डनचे काम करत असल्याची बाब पोलिस तपासात उघड झाली आहे.

कल्याण नेतिवली परिसरात राहणारे इंद्रजीत गुप्ता हे फेरिचा व्यवसाय करुन गुरुवारी दुपारी आपल्या दुचाकीवरुन मेट्रो मॉल परिसरातून जात होते. यावेळी दोघांनी त्यांची दुचाकी अडवली. त्यातील एकाने इंद्रजीत यांना आपण पोलीस असल्याचे सांगत लायसन्स दाखविण्यास सांगितले.

यावेळी गुप्ता यांनी लायसन्स नसल्याचे सांगितल्याने दोघा भामट्यांनी त्यांना तुम्हाला अकराशे रुपये दंड भरावा लागेल. तसेच पोलिस चौकीत यावे लागेल अशी बतावणी केली. यातील एक भामटा इंद्रजित यांच्यासोबत त्यांच्या गाडीवर बसला.

इंद्रजित यांना बोलण्यात गुंतवून चक्कीनाका येथील वखारीजवळ आरोपींनी गाडी थांबवत गुप्ता यांना खाली उतरविले. त्यानंतर गाडी घेऊन आरोपी पसार झाला. आपली फसवणूक झाल्याचं गुप्ता यांच्या लक्षात येताच, त्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख, सहाय्यक पोलिस निरिक्षक हरिदास बोचरे, दिनकर पगारे यांच्या पथकाने सीसीटीव्ही च्या मदतीने अवघ्या तीन तासात आरोपी दिलीप याला अटक केली. दिलीप हा उल्हासनगर महापालिका हद्दीत ट्रॅफिक वार्डन म्हणून पूर्वी काम करत होता.

काही गुन्ह्यांप्रकरणी त्याच्यावर कल्याण न्यायालयात खटला सुरु आहे. न्यायालयातील सुनावणीसाठी तो गावावरुन कल्याण येथे आला होता. कल्याण येथे येताच त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने वाहतूक पोलिस असल्याची बतावणी करत मोटारसायकल स्वारांस लुटण्यास सुरुवात केली होती. पोलिसांनी दिलीप याला अटक केली असून त्याच्या साथीदाराचा तपास सुरु असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : केडीएमसीच्या निवडणुकीसाठी नऊ ठिकाणी मतमोजणी

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT