मुंबई

सामाजिक संतुलनासाठी 21 हजार कोटींचा निधी, विधीमंडळात पुरवणी मागण्या सादर 

संजय मिस्कीन

मुंबई , ता. 14: राज्यातील विविध जातींच्या सामाजिक संतुलनासाठी आज राज्य सरकारने भरीव तरतूद असलेल्या तब्बल 21 हजार 99  कोटीच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. कोरोनाच्या संकटकाळात राज्याची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. मात्र अनलॉक होताच राज्याची आर्थिक घडी पुन्हा पूर्वपदावर येत असताना या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या आहेत.

आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने  मराठा समाजात अस्वस्थता आहे. तर ओबीसी समाजातही आरक्षणाच्या मुद्द्यावरून नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने  पुरवणी मागण्यात या दोन्ही समाजासाठी तरतुद केली आहे.  यामध्ये ओबीसी समाजाच्या महाज्योती संस्थेला 81 कोटींची तरतुद करण्यात आली आहे. महाज्योती संस्थेला पैसे देण्याची मागणी मागील काही दिवसांपासून होत होती.

याचबरोबर ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी 11 कोटींची तरतुद पुरवणी मागण्यात करण्यात आली आहे. भटक्या जमाती, विमुक्त जमातींच्या आश्रमशाळांसाठी 216 कोटींची तरतुद करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती असल्याने आक्रमक असलेल्या मराठा समाजाच्या सारथी संस्थेसाठी 80 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. 

सारथी संस्थेला निधी मिळावा यासाठी अनेक आंदोलनेही झाली होती. तर पुरवणी मागण्यात इंदु मिलसाठी 100 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी 2211 कोटी रुपयांची तरतूद केली असून सरकारने यापूर्वीच घोषणा केलेल्या धान उत्पादकांच्या मदतीसाठी 2850 कोटीची तरतूद केली आहे. आमदारांची मोठी मागणी असलेल्या आमदार विकास निधीसाठी पुरवणी मागण्यांमध्ये 476 कोटींची तरतूद केली आहे. आजपासून सुरू झालेल्या विधिमंडळाच्या दोन दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये या मागण्यांवर चर्चा होऊन मंजुरीची औपचारिकता पार पाडली जाणार आहे.

पुरवणी मागण्यातील इतर काही महत्त्वाच्या तरतुदी -

  • पिक नुकसानीचे शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 2211 कोटी रुपयांची तरतुद
  • धान उत्पादकांना बोनस देण्यासाठी 2850 कोटी
  • कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबई आणि नागपूर येथील विधानभवनात निगेटीव्ह प्रेशर राखणारी वातनुकुलीत यंत्रणा बसवण्यासाठी 22 कोटी रुपये
  • आमदार निवास बंद असल्याने आमदारांच्या निवास व्यवस्थेसाठी 8 कोटींची तरतुद
  • आमदार विकास निधीसाठी 476 कोटींची तरतुद

funds of Rs 21000 crore for social balance supplementary demands submitted in winter session

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT