मुंबई

कोविडनंतर रुग्णांना म्युकर मायकोसिसचा धोका; रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांना जास्त त्रास

भाग्यश्री भुवड

मुंबई, 23: कोविडमधून बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांना वेगवेगळ्या मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशातच आणखी एक भयानक आजार कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांना होत असून त्याची भीती सध्या लोकांमध्ये पसरली आहे. म्युकर मायकोसिस असे या आजाराचे नाव असून पालिकेच्या केईएम रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या पोस्ट कोविड ओपीडीत या आजारासह येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. 

रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांना धोका - 

या आजाराचा सर्वाधिक धोका रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांना आहे. त्यामुळे, डाॅक्टरांनी अशा लोकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. कोरोनातुन बरे होण्यासाठी जास्तीत जास्त केला जाणारा स्टेरॉईड्सचा वापर केला जात आहे त्याचा परिणाम आणि अनियंत्रित मधुमेह यामुळे हा बुरशीजन्य आजार म्युकर मायकोसिसची लक्षणे रुग्णांमध्ये दिसत आहेत. या आजारात रुग्णांची दृष्टि कमी होणे, मेंदूत बुरशी जमा होणे यातून जिवाला ही धोका निर्माण होतो. त्यामुळे, हा आजार इतर बुरशीच्या आजारापेक्षा अधिक घातक असल्याचे मत केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. हेमंत देशमुख यांनी मांडले आहे. 

KEM  रुग्णालयात सहा रुग्ण - 

पालिकेच्या केईएम रुग्णालयात पोस्ट कोविड ओपीडीत आतापर्यंत 4 ते 6 रुग्ण आले आहेत. ज्यांना म्युकर मायकोसिसची लक्षणे आढळून आली आहे. दरम्यान, या आजाराचे रुग्ण आधीपासूनच केईएम रुग्णालयाच्या ओपीडीत येत होते. त्यामुळे, हा आजार डाॅक्टरांसाठी नवीन नसला तरी कोविड मधून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांना होत असल्याने वैद्यकीय क्षेत्रातून काळजी व्यक्त केली जात आहे. 

या आजाराविषयी आणि येणाऱ्या रुग्णाबाबतची माहिती देताना केईएम रुग्णालयातील कान-नाक-घसा या विभागाच्या प्राध्यापक आणि प्रमुख डॉ. हेतल मारफातिया यांनी सांगितले की, कोविडमुळे रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. त्यात उपचारात स्टेरॉयड दिले जाते. हा एक बुरशीजन्य आजार आहे. जी बुरशी शरीरातील मेंदू, नाक या अवयवांवर हल्ला करते. नाक आणि सायनस म्हणजेच हवेच्या पोकळ्यांमध्ये वाढते. सुरुवातीला हे लक्षात येत नाही. मात्र, चेहऱ्याला सुज येणे, मेंदूत जाणे, डोळ्यांना सुज येणे अशी लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे, लोकांनी कोविडनंतरही काळजी घ्यावी, शुगर नियंत्रणात ठेवावी. व्यायाम करावा आणि आहाराकडे विशेष लक्ष द्यावे. सहा आठवड्यापर्यंत याचा औषधोपचार असतो. 

जेजे रुग्णालयात ही पाच रुग्ण - 

जे जे रुग्णालयात पाच म्युकर मायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत. कोरोना संसर्ग झाल्यानंरच्या 60 हुन अधिक दिवसांनी याची लक्षणे दिसून येतात. अनियंत्रित मधुमेहींमध्ये हा आजार आढळून येतो.

fungal infection mucormycosis observed in post covid patients people with lack of immunity to face problem

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Kolhapur Lok Sabha : लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; कार्यकर्त्यांत लागल्या पैजा, सट्टाबाजारातही उलाढाल जोरात

SCROLL FOR NEXT