मुंबई : उद्धव ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करताच खासदार गजानन किर्तीकर यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. खासदार संजय राऊत यांच्यावरील कारवाई चुकीचीच असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. (Gajanan Kirtikar shows support to Sanjay Raut who enters in Eknath Shinde group now)
संजय राऊत यांच्यावरील कारवाईवर भाष्य करताना किर्तीकर म्हणाले, कोर्टाचं म्हणणं शंभर टक्के बरोबर आहे, कोर्ट चुकलेलं नाही. कारण त्यांच्यावरचा आरोप फार किरकोळ आहे. राऊतांबाबत ठाम भूमिका मांडल्यानं किर्तीकरांच्या विधानाची सध्या चर्चा सुरु आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंवर टीका करताना आपलं तिकीट कापण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोपही त्यांनी केला. उद्धव ठाकरेंनी माझं तिकीट कापून अरविंद सावंत यांना तिकीट दिलं, असं त्यांनी म्हटलं आहे. शिंदे साहेब, तुम्ही उत्तम काम करा. मी संघटना बांधण्याचं काम करेन. संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये शिस्त आणण्याचं काम करेन, असंही किर्तीकर यावेळी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.