मुंबई

गणेशोत्सव मंडळे धर्मादाय आयुक्तांच्या दारी

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : गणेशोत्सवामध्ये वर्गणी गोळा करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी अत्यावश्‍यक आहे. या पार्श्‍वभूमीवर अनेक मंडळांची धावपळ वाढली आहे. अलिबागमधील धर्मादाय उपायुक्तांच्या कार्यालयात ऑलाईन नोंदणीसाठी त्यामुळेच दुप्पट गर्दी होत आहे. या नोंदणीची अंतिम तारीख 2 सप्टेंबर आहे. 

गणेशोत्सवात वर्गणी गोळा करणाऱ्या प्रत्येक मंडळासाठी सार्वजनिक विश्‍वस्त मंडळ अधिनियम 41 (क) नुसार परवानगी घेणे आवश्‍यक आहे. ही परवानगी गोपाळकाला मंडळ, आपत्कालीन निधी संकलन करणाऱ्या मंडळांनाही सक्तीची आहे. 

गणेशोत्सव अवघ्या 13 दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील मंडळांची अशा नोंदणीसाठी अलिबाग येथील धर्मादाय उपायुक्त कार्यालयात गर्दी वाढली आहे. 

उपायुक्त कार्यालयातून दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक वर्गणी जमा करणाऱ्या मंडळाला नोंदणी अत्यावश्‍यक आहे; त्याचबरोबर यापूर्वी नोंदणी झालेल्या मंडळांचे हिशेब धर्मादाय कार्यालयाकडे सादर करावे लागणार आहेत. अन्यथा ही मंडळे बेकायदा असल्याचे घोषित करून त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. धर्मादायक आयुक्त कार्यालयाकडून ऑनलाईन ऑफलाईन सुविधा सुरू करण्यात आलेल्या आहेत. यासाठी www.charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पीपीटी फॉरमॅटमध्ये माहिती उपलब्ध आहे. 

परवानगी घेतलेल्या गणेश मंडळांना गतवर्षीचा हिशेब सादर करणे बंधनकारक आहे. तसेच नवीन मंडळांनी अर्ज करताना संबंधित क्षेत्रातील महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, नगरपंचायत व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून गणेशोत्सव साजरा करण्याची अनुमती असल्याचे पत्र व जागामालकाचे "ना हरकत' प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. 

आर्थिक व्यवहार करणाऱ्या मंडळांवर नियंत्रण असावे, यासाठी मंडळ नोंदणी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. याव्यतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगीही आवश्‍यक आहे. 
- अंजली पिसाळ, कार्यालयीन अधीक्षिका, धर्मादाय उपायुक्त कार्यालय, अलिबाग  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT