Gangster Chirag Loke Die Esakal
मुंबई

Gangster Chirag Loke Die: शरद मोहोळनंतर आणखी एका गुंडाची हत्या; हल्ल्यात पत्नी देखील गंभीर जखमी

Gangster Chirag Loke Die: गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुण्यासह मुंबई आणि उपनगरांमध्ये गुन्हेगारी घटनांची मालिका सुरूच आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

नवी मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुण्यासह मुंबई आणि उपनगरांमध्ये गुन्हेगारी घटनांची मालिका सुरूच आहे, अशातच नवी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येप्रमाणेच आणखी एका गुंडाची हत्या करण्यात आली आहे.

माथाडीच्या साईटवरुन झालेल्या वादातून पाच हल्लेखोरांनी नेरुळ सेक्टर-20 मध्ये राहणाऱ्या गुंड चिराग महेश लोके (30) याची निर्घुणपणे हत्या केल्याची घटना काल(मंगळवारी) सायंकाळी घडली. या हल्ल्यामध्ये गुंड लोके याची पत्नी प्रियंका लोके (28) ही देखील गंभीर जखमी झाली असून तिच्यावर नेरुळ मधील डी.वाय.पाटील हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील मृत चिराग लोके हा नेरुळ सेक्टर-20 मध्ये राहत होता. तसेच तो अरुण गवळी व शरद मोहोळ या टोळीसाठी काम करत होता. चिराग लोके याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहुन नेरुळ पोलिसांनी त्याच्यावर काही दिवसांपुर्वी मोक्कांतर्गत कारवाई केली होती. मंगळवारी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास चिराग लोके व त्याची पत्नी हे दोघे त्यांच्या मुलाला शाळेतून घरी घेऊन जात असताना आरोपी अरविंद सोडा व त्याच्या साथीदारांनी त्याला अडवुन लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली होती.

यावेळी त्याची पत्नी प्रियंका त्याला वाचवण्यासाठी मध्ये गेली असता, या हल्लेखोरांनी तिच्यावर देखील लोखंडी रॉडने जिवघेणा हल्ला करुन पलायन केले. यात चिरागचा जागीच मृत्यू झाला. तर त्याची पत्नी प्रियंका गंभीर जखमी झाली असून तीच्यावर नेरुळमधील डॉ.डी.वाय.पाटील हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर नेरुळ पोलिसांनी आरोपी आरोपी अरविंद रामनाथ सोडा, अरबाज, पगला, शेरा व इतर दोन अशा एकुण पाच मारेकऱ्यांविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न व इतर कलमाखाली गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.

दरम्यान, मृत चिराग महेश लोके व आरोपी आरोपी अरविंद रामनाथ सोडा हे दोघे एकाच जेलमध्ये होते. त्यामुळे त्यांची एकमेकांशी ओळख झाली होती. गेल्या काही महिन्यांपासून अरविंद डोसा व चिराग यांच्यामध्ये मानखुर्द येथे असलेल्या माथाडी साईटवरुन वाद सुरु होता. याच वादातून गेल्या 9 फेब्रुवारी रोजी चिराग व त्याची पत्नी प्रियांका या दोघांना काही गुंडांनी माथाडी साईटच्या वादातून धमकावले देखील होते. याच वादातून चिरागची हत्या झाल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार नेरुळ पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhada: रहिवाशांना गुडन्यूज! घरं रिकामी करण्यासाठी शिप्टींन चार्जेस देणार, आर्थिक मदतीसाठी म्हाडाचा मोठा निर्णय

EKA Mobility : इलेक्ट्रिक वाहन निर्मिती, स्त्रीसन्मान अन् तरुणांना रोजगार; EKA Mobility चा तिहेरी विजय! वाचा सविस्तर यशोगाथा

T20 World Cup 2026: पाकिस्तानी सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये अव्वल अन् विकेट्स घेणाऱ्यांमध्ये अमेरिकन टॉपर! भारतीय कुठेत?

Money Lending Law: महाराष्ट्रातील सावकार अडचणीत येणार! कायद्यात मोठा बदल होणार; महाराष्ट्र सरकार महत्त्वाचं पाऊल उचलणार

Virar News : भाजपला धक्का! भाजप महिला मोर्चा प्रमुख ॲड. साधना धुरी यांचा बविआत प्रवेश

SCROLL FOR NEXT