Ganesh Murtikar Sakal Media
मुंबई

गणेश मूर्तिकारांवर आर्थिक संकट, सरकारच्या नियमावलीमुळे उपासमार!

सरकारच्या नियमावलीमुळे मूर्तिकार आर्थिक गर्तेत

कुलदीप घायवट

मुंबई : मागील वर्षी कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे (Corona Lockdown) मूर्तिकारांच्या गणेशमूर्त्या विकल्या नाहीत. परिणामी, मूर्तिकार, कारागिरांना मोठा आर्थिक फटका बसला. तर, यंदाही सरकारने गणेशमूर्ती सार्वजनिक मंडळाची (Ganpati Festival) गणेशमूर्ती 4 फुटांपेक्षा जास्त नसावी, अशी नियमावली जाहिर केली. तर, घरगुती गणेश भक्त घरीच पर्यावरण पूरक, माती, लगदा यापासून मूर्तीची स्थापना करत आहेत. त्यामुळे गणेश मूर्तिकारांकडे (Ganpati Statuary) मूर्तीची मागणी कमी झाली. त्यामुळे गणेश मूर्तिकारांवर उपासमारीची (Weak Finance) वेळ आली आहे. सरकारने मूर्तीच्या उंचीच्या नियमात शिथिलता आणावी, अशी मागणी मूर्तिकारांनी केली आहे. ( Ganpati Statuary Facing Financial Problems due to corona rules of Maharashtra Government-nss91)

दरवर्षी मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव साजरा केला जात होता. गणपतीची मूर्ती घडविण्याचे दृश्य पाहण्यासाठी गणेश कार्यशाळेत आबालवृद्धांच्या रांगा लागायच्या. मात्र, मागील वर्षींचा आणि यंदाच्या गणेशोत्सवात कोरोनाच्या लाटेचे संकट आले. तर, यात भर म्हणजे सार्वजनिक चार फूट तर घरगुती दोन फुटांपर्यंतच्या मूर्ती स्थापना करण्यासाठी शासनाकडून बंधने घातली. या नियमावलीमुळे गणेश मूर्तिकार आर्थिक कात्रीत सापडले आहेत. परिणामी, बहुतांश गणेश भक्तांनी दीड ते दोन फूट उंचीच्या गणपती मूर्ती स्थापन करण्याचे नियोजन केले आहे. अनेकांनी घरच्या घरीच मूर्ती बनविण्याचे ठरविल्याने कारागिरांनी बनविलेल्या मूर्त्या तशाच राहिल्या आहेत.

मागीलवर्षी नेहमीचे 100 ग्राहक कमी झाले. त्यामुळे मागील वर्षीच्या 100 मूर्त्या तशाच ठेवाव्या लागल्या. मूर्ती ठेवण्यासाठी जागेची कमतरता भासल्याने भाड्याने  खोली घ्यावी लागली. यासाठी लाखो रुपयांचे भाडे गेले. तर, आता मूर्त्यांना पुन्हा रंग काम करण्यासाठी, फिनिशिंग करण्यासाठी अधिकचा खर्च करावा लागला आहे. यात राज्य सरकारच्या नियमावलीमुळे नवीन ग्राहक येत नाही. सर्वजण संगमरवर, चांदीची मूर्ती घेण्याकडे कल आहे. त्यामुळे गणेश मूर्तिकारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

- सुनील पांचाळ, गणेश मूर्तिकार

राज्य सरकारने नुकताच प्रसारित केलेल्या नियमावलीमुळे सर्व गणेश मूर्तिकार संकटात सापडले आहेत. नियमावलीमध्ये सार्वजनिक गणेश मंडळांची गणेशमूर्ती 4 फुटांपेक्षा जास्त नसावी, असे बंधनकारक केले आहे. मात्र, या नियमात शिथिलता आणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांचा विचार करत तुलनात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. मागील वर्षी कोरोनाबाबत, सामोरे कशाप्रकारे जायचे, याची जास्त माहिती नव्हती. मात्र, आता कोरोनाला सामोरे जाण्याचा अंदाज आला आहे. त्यामुळे प्रत्येक कलावंत आपली व इतरांची काळजी घेऊन काम करत आहे. यंदाही नियमावली तशीच ठेवली तर, कलावंताच्या पोटाचा प्रश्न सोडविणे कठिण होईल. आर्थिक गर्तेत सापडलेल्या वर्धा येथील मूर्तिकाराने आत्महत्या केली. सध्याची परिस्थिती गंभीर आहे. मुख्यमंत्र्यांना स्वतः कलेची आवड आहे. त्यामुळे त्यांनी गणेश मूर्तिकारांचा प्रश्न लवकरात लवकर सोडविणे आवश्यक आहे.  

-  रेश्मा खातू, गणेश मूर्तिकार

गणेशमूर्ती बनविण्याचा अनेकांचा पारंपरिक व्यवसाय आहे. वर्षातून एकदाच गणेशमूर्ती घडविण्यावरच मूर्तिकारांचा उदरनिर्वाह चालतो. त्यानंतर नवरात्रीसाठी देवीच्या मूर्ती बनविण्यासाठी काही प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. मात्र, गणेशोत्सव मोठ्याप्रमाणात साजरा केला जात असल्याने जास्तप्रमाणात उत्पन्न मिळते. मात्र, मागील वर्षीसह यंदाच्या वर्षीही कधी न झालेल्या तोट्याला मूर्तिकारांना सामोरे जावे लागले आहे. मागील वर्षी विक्रीत घट झाली. त्यामुळे बनविलेल्या मूर्त्या मोठ्या प्रमाणात उरल्या. या मूर्त्यांची विक्री न झाल्यामुळे आर्थिक संकटात मूर्तीकार सापडले होते. यंदाच्या वर्षी परिस्थिती सुरळीत होत असताना, राज्य सरकारची नियमावली जाहिर झाली. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये मूर्तीच्या उंचीवरून गोंधळ निर्माण झाला आहे. तर, घरगुती मूर्ती घेणारे देखील यंदा चांंदीची, संगमरवराची, चॉकलेट, नारळाच्या करंवट्याची मूर्ती घेण्याकडे कल आहे. परिणामी, शाडूच्या मातीची आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती घेणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT