धोक्याचा इशारा असतानाही त्यांनी केलं 'हे' काम; ४ तास नागरिक वेठीला..  
मुंबई

धोक्याचा इशारा असतानाही त्यांनी केलं 'हे' काम; ४ तास नागरिक वेठीला..

अर्चना राणे-बागवान

नवी मुंबई : सीवूड्‌समधील सेक्‍टर ३६ येथे दुपारी १ च्या सुमारास महानगर गॅस वाहिनीला लागलेल्या गळतीमुळे परिसरातील इमारतींमधील गॅस पुरवठा जवळपास चार तास बंद करण्यात आला होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर महानगर गॅसच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. 

 करावे गाव सेक्‍टर ३६ येथील मोहन पॅराडाईस या इमारतीच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. हे काम करणाऱ्या कंत्राटदाराने रस्त्याला लागून जेसीबीद्वारे खोदकाम सुरू केले. त्यावेळी तेथे पिवळ्या रंगाची ‘डेंजर’ अलर्ट देणारी फीत दिसल्यानंतरही त्याने खोदकाम सुरू ठेवले व गॅस वाहिनीचे नुकसान झाले. याबाबत माहिती दिल्यानंतर महानगर गॅसच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. 

महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, संबंधित कंत्राटदाराने खोदकाम सुरू करण्यापूर्वी महानगर गॅसची परवानगी घेणे आवश्‍यक होते. मात्र परवानगी न घेताच खोदकाम सुरू केले. शिवाय धोक्‍याची सूचना देणारी फीत दिसल्यानंतरही जेसीबी चालकाने खोदकाम सुरूच ठेवल्याने गॅस वाहिनीचे नुकसान झाले.

सीवूडस सेक्‍टर ३६ येथील मोहन पॅराडाईस या इमारतीच्या पुनर्विकासाचे काम सुरू असताना गॅस वाहिनीचे नुकसान झाले. त्यामुळे सेक्‍टर ३६ व ४२ ए येथील गॅस पुरवठा बंद करण्यात आला होता. संध्याकाळी ५ पर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन गॅस पुरवठा सुरळीत होईल.  
- नीरा अस्थाना, प्रवक्ता, महानगर गॅस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: ''लोकांच्या आयुष्यात सरकारचा हस्तक्षेप नको'', मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?

SRH vs RCB Live: रसिख दारच्या 'यॉर्कर'ने ट्रॅव्हिस हेडचा त्रिफळा उडवला, विराट कोहली कसला पेटला... सेलिब्रेशन एकदा पाहाच Video

IPL 2026 : KKR ला मोठा धक्का! सर्वाधिक धावा करणारा फलंदाज स्पर्धेतून बाहेर; प्ले ऑफच्या शर्यतीत आता तग कसा धरणार?

काँग्रेसकडून जिल्हाध्यक्षांची नियुक्ती! पक्षाकडून नव्या चेहऱ्यांना संधी; ६९ जणांचा समावेश

Physics NEET Paper Leak Case : नीट फिजीक्सचा पेपर फोडणाऱ्या महिलेचे नाव समोर, सीबीआयची पुण्यात मोठी कारवाई; तीसरी पण 'मनिषा'च शोधली

SCROLL FOR NEXT