delivery girl
delivery girl 
मुंबई

क्या बात है! लॉकडाऊनमध्ये 'डिलिव्हरी गर्ल'ने शोधली रोजगाराची नवी संधी; जाणून घ्या काय ते... 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : लॉकडाऊनने अनेकांचा रोजगार बुडाला. त्यांच्या समोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला. त्यामुळे महिलांची तर मोठी गैरसोय होत होती. तुमच्या घरी एखादे पार्सल आणून देण्यासाठी डिलिव्हरी बॉय आलेला पाहिला असेल. आता मात्र थोडं वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. कारण आता मात्र घरोघरी पार्सल पोहोचते करण्यासाठी महिलाही या क्षेत्रात उतरल्या असून त्यादेखील डिलिव्हरी बॉयप्रमाणे डिलिव्हरी गर्ल म्हणून काम करत आहे. 

दादर येथील मोटरसायकल प्रशिक्षक अमृता माने यांनी महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, म्हणून डिलिव्हरी गर्ल संकल्पना पुढे आणली. स्वतः मोटरसायकल ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षक महिला व मुलींना ही नव्या व्यवसायाची वाट करून दिली. सध्या अमृता यांच्याकडे 10 डिलिव्हरी गर्ल काम करतात. 

आता सुट्या पैशांची कटकट मिटली! बसमध्ये टिकीट घेतांना वापरा 'ही' पेमेंट पद्धत

डिलिव्हरी गर्ल ही संकल्पना आपल्याकडे फार रुळलेली नाही. पण डिलिव्हरी गर्ल सुद्धा डिलिव्हरी बॉयप्रमाणे सक्षमपणे काम करत आहे. लॉकडाऊनमुळे घरपोच डिलिव्हरी देणाऱ्यांना प्रचंड मागणी आहे. माझी स्वतःची 'वुमन्स ऑन व्हिल' या मोटर सायकल ट्रेनिंग स्कूल आहे. माझी स्कूल महिलांना मोटरसायकल व  स्कुटी चालवण्याचे प्रशिक्षण देते.  माझ्या ट्रेनिंग स्कूलमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी डिलिव्हरी गर्ल संकल्पना सुचली. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले, अशी अमृता यांनी माहिती दिली.  

सध्या लॉकडाऊनमध्ये स्कूल बंद आहे. माझ्या येथे काम करणाऱ्या महिलांना रोजगार कसा उपलब्ध करुन देता येईल, यावर माझा विचार सुरू होता.  डिलिव्हरी बॉयप्रमाणे महिलाही डिलिव्हरी गर्ल म्हणून काम करतील, असा निश्चय करून 8 जूनला 'वॉव डिलिव्हरीज्' म्हणून नवीन व्यवसायाचा श्रीगणेशा केला. सुरुवातीला दादर-माटुंगा या परिसरात ऑर्डर डिलिव्हरीसाठी सुरुवात केली, असे अमृता यांनी सांगितले. 

आता आमच्या सेवेला एक महिना पूर्ण होईल या एक महिन्यात दक्षिण मुंबई, पश्चिम उपनगरात अंधेरीपर्यंत पूर्व उपनगरात घाटकोपर पर्यंत डिलिव्हरी  देण्यात येते. हॉटेलस् , दुकानांमधून डिलिव्हरीसाठी मागणी होत आहे. त्यामुळे मला प्रत्येक आठवड्याला नवीन डिलिव्हरी गर्लची भरती करावी लागते. हा पार्ट टाईम जॉब असून काम करणाऱ्या महिलेला पगार दिला जातो. कामाच्या शिफ्ट आहेत. सकाळी 9.30 पासून सुरुवात होते. एक शिफ्ट पाच तासाची असते. माझ्याकडे काम करणाऱ्या महिला व मुलींना सोयीस्कर वाटेल त्या प्रमाणे वेळ देण्यात येते.  चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे अमृता म्हणाल्या.
 
अशी घेतली जाते काळजी 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या बाहेर काम करताना स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक महिला चालकाने मास्क परिधान करते व हॅण्ड ग्लोव्ह्सचाही वापर करते. ही सेवा पूर्णत: नो कॉन्टॅक्ट डिलिव्हरीवर असून ग्राहकांशी  प्रत्यक्ष संपर्क टाळण्याकरता ऑनलाईन पेमेंटचा स्वीकार केला जातो, असे अमृता यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

Latest Marathi News Live Update : मुंबई स्थानकावर अमरावती एक्सप्रेसला किरकोळ आग

SCROLL FOR NEXT