housing federation 
मुंबई

घरकामगार, प्लंबर यांना ईमारतीत प्रवेश मिळण्याबाबत सूचना द्या; हाऊसिंग फेडरेशनची सहकारमंत्र्यांकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई:  घरकामगार, प्लंबर, सुतार आदी कामगारांना कोरोनाच्या भीतीमुळे अनेक ईमारतींमध्ये प्रवेश मिळत नाही. त्यामुळे होणारे लोकांचे हाल टाळण्यासाठी सहकार खात्याने गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष, सचिव आदींना सूचना द्याव्यात, अशी मागणी मुंबई जिल्हा सहकारी हाऊसिंग फेडरेशनतर्फे सहकारमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. 

घरकामगारांना ईमारतीत प्रवेश देण्यावरून रहिवासी तसेच गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी यांच्यात वाद होत आहेत. बऱ्याच ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनानेच घरकामगारांवर बंदी लादल्याने ज्येष्ठ नागरिक रहिवाशांचे हाल होत आहेत. याच विषयावर उच्च न्यायालयात सादर झालेली याचिकाही मागे घेण्यात आली. इमारतींमध्ये घरकामगार, भाजीवाले आदींना संमती द्यावी, अशी सूचना सहकारमंत्र्यांनी केली होती. 

सहकार खात्याच्या काही उपनिबंधकांनीही आपापल्या स्तरावर घरकामगारांना परवानगी देण्याचे आदेश गृहनिर्माण संस्थांना दिले आहेत. मात्र यासंदर्भात सहकार खात्याने नेमके आदेश काढावेत, अशी मागणी फेडरेशनने केली आहे. 

बाहेरचा माणूस इमारतीत आला तर कोरोनाचा फैलाव होण्याची भीती पदाधिकाऱ्यांना वाटते. एकीकडे या घरकामगारांना इमारतीत प्रवेश नसल्याने ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत व त्याचमुळे इमारतीत भांडणे होत आहेत. तर दुसरीकडे घरकामगारांना प्रवेश नाकारणाऱ्या गृहनिर्माण संस्थांवर कारवाईचे सूतोवाच सहकारमंत्र्यांनी केले आहे. 

या अशा गोंधळाच्या परिस्थितीमुळे इमारतीच्या पदाधिकाऱ्यांना काय करावे ते कळेनासे झाले आहे. त्यामुळे कुपणाची भिंत-सुरक्षा रक्षक अशा सोयी नसलेल्या इमारती, क्लब हाऊस-व्यायमशाळा-मोकळी जागा अशा सोयी असलेल्या इमारती व बहुसंख्य सभासद ज्येष्ठ नागरिक असलेल्या इमारती अशा वेगवेगळ्या परिस्थितीचा विचार करून सहकार खात्याने यासंदर्भात सर्वसाधारण नियमावली काढावी, अशी मागणी फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, सचिव डी. एस. वडेर आदींनी केली आहे. 

कामगारांना संमती द्या:

तर सहकारी संस्थांच्या पी विभागाचे उपनिबंधक डॉ. महेश साळुंकेपाटील यांनी नुकताच एक आदेश काढून घरकामगारांना इमारतीत प्रवेश द्यावा, असे सांगितले आहे. संस्थेच्या सदस्यांना अत्यावश्यक सेवा देणारे घरकामगार, सफाईकामगार, प्लंबर, इलेक्ट्रिशन, गॅस व पाणी सेवापुरवठादार आदींना संस्थेमध्ये प्रतिबंध करू नये. हे कामगार प्रतिबंधित क्षेत्रात रहात नसल्याची फक्त खात्री करावी. पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या मनाने नियम करून ते सदस्यांवर लादू नयेत. या आदेशाचे पालन न केल्यास संस्थेविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथ अधिनियम यानुसार कारवाई केली जाईल, असा इशाराही आदेशात देण्यात आला आहे.

give entry plumbers and electricians in buildings 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Strike: 11 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी नाही तरी बँका बंद! सलग 4 दिवस बँका बंद राहणार? पाहा काय सुरू राहणार

Eknath Shinde: ठाकरे गटानंतर शिंदेसेनेला धक्का, बालेकिल्ल्यातील नगरसेवकाचे पद रद्द

iPhone 18 India Price: भारत ठरला iPhone 18 खरेदीसाठी जगातील दुसरा सर्वात महागडा देश! अमेरिकेपेक्षा तब्बल 50,000 रुपये जास्त!

US Open 2026: पहाटे ३.३३ वाजेपर्यंत रंगला थरार; ४ तास २८ मिनिटांच्या लढतीनंतर शेल्टनने गतविजेत्या अल्काराझला दिला धक्का

Marathi News Live Updates : पालिकेचा विरोध डावलून कॉरिडॉर होणारच; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पोस्टने पंढरपुरात राजकीय वातावरण तापले

SCROLL FOR NEXT