मुंबई

कंपन्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्या 

सकाळ वृत्तसेवा


शहापूर : महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाप्रमाणे स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत ८० टक्के प्राधान्य असतानाही स्थानिक भूमिपुत्रांना रोजगारमिळत नाही. शहापूर तालुक्‍यातील वासिंद, आटगाव, आसनगाव आदी ठिकाणी असलेल्या एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणात लहान-मोठे उद्योगधंदे व कंपन्या आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगारांना रोजगार दिला जात आहे. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना रोजगारासाठी वणवण फिरावे लागते.

तालुक्‍यातील सर्वच कंपन्यामध्ये प्रथम स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य द्याव, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष देवेंद्र निचिते यांनी शहापूरच्या तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून व्यक्त केली आहे. तसेच तालुक्‍यातील कंपन्यांमध्ये ८० टक्के स्थानिकांना रोजगार न मिळाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरेल, असा इशारा दिला आहे.

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : काँग्रेस सत्तेत आल्यास मोफत उपचार बंद होतील - पीएम मोदी

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT