local 
मुंबई

'या' ९ प्रकारच्या कर्मचाऱ्यांनाही लोकल प्रवासाची परवानगी द्या; खासदार अरविंद सावंत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यात बाधीत रुग्णांची संख्या वाढत असतांना, कोरोनाची भिती असतांना, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी राज्य शासनाच्या विनंतीवरून रेल्वे मंत्रालयाने लोकल सेवा सुरू केली आहे. मात्र, यामध्ये अत्यावश्यक सेवेतील अनेक आस्थापनांवरील कर्मचारी सुटल्याने अशा नऊ प्रकारच्या कर्मचाऱ्यांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. 

रेल्वे मंत्रालयाने 15 जून पासून मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर लोकल सुरू केली आहे. मात्र यामध्ये पोलिस महानगरपालिका कर्मचारी, राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांनाच लोकलची सेवा करण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्याशिवाय अनेक असे विभाग आहेत, ज्या विभागातील कर्मचारी अत्यावश्यक सेवेत मोडत असला तरी, त्यांना मात्र, लोकल प्रवासाची बंदी घालण्यात आली. 

त्यामुळे शिवसेना खासदार  अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अत्यावश्यक सेवांच्या आस्थापनांतील कर्मचाऱ्यांना रेल्वेतून प्रवास करण्यासाठी ई- पास देण्याची मागणी केली आहे. राज्य सरकार आणि महापलिकतेच्या माध्यमातून मुंबईच्या लोकल रेल्वे प्रवास करण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांना ई-पास देणेबाबत मुंबई महापालिकेने एक परिपत्रक निर्गमीत केलेले आहे. त्यामध्ये विविध आवश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आस्थापनांची नावे नमूद करण्यात आलेली असल्याचे ही अरविंद सावंत य़ांनी सांगितले आहे.  

या कर्मचाऱ्यांसाठी लोकल प्रवासाची मागणी:

विविध सरकारी व सहकारी बँका, पतपेढ्या, महानगर टेलिफोन निगम लिमिटेड, बीएसएनएल, एसटी महामंडळाचे कर्मचारी, टपाल खाते, माझगाव डॉक, नेव्हल डॉक, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि पत्रकार या सर्व आस्थापनामंधील कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेमधील कर्मचारी असून त्यांना रेल्वेतून प्रवास करण्यासाठी ई- पास देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच पश्चिम रेल्वे मार्गांवर एसटी प्रवाशांना प्रवास करण्याची मान्यता मिळण्याची शक्यता आहे. 

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मान्यता मिळण्याची शक्यता आहे. तसे पश्चिम रेल्वे प्रशासनाचे महामंडळाला शुक्रवारी पत्र आले आहे. या प्रवासामध्ये एसटी कर्मचाऱ्यांना आपले ओळख पत्र दाखवून तिकीट मिळवता येणार आहे.  त्यानंतरच प्रवास करता येणार असल्याचे कर्मचारी वर्ग व औद्योगीक संबंध विभागाचे महाव्यवस्थापक शैलेंद्र चव्हाण यांनी सांगितले आहे.

give permission of local train to these 9 ype of employees 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

Pune News : पेशवेकालीन भूमिगत जलवाहिनी जीर्णोद्धारास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी

CGHS नियमांमध्ये मोठा बदल! आता आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्यापैकी एकालाच मेडिकल लाभ मिळणार; नवा नियम लागू

PBKS vs MI Live : शार्दूल ठाकूरची 'स्टम्प' तोड गोलंदाजी! पंजाबने ३३ धावांत गमावले ६ फलंदाज; 'लॉर्ड'च्या ४ विकेट्सने फिरली मॅच Video

SCROLL FOR NEXT