मुंबई

मुंबईकरांनो कोरोनाबाबत एक उत्तम बातमी , नीती आयोगानं केला खुलासा...

सकाळवृत्तसेवा

मुंबई- आजपासून महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातला कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यावर नजर टाकल्यावर सर्वाधिक प्रार्दुभाव हा मुंबईत झालेला दिसतोय. त्याचदरम्यान मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा 14.5 दिवसांवर आला असल्याची माहिती नीती आयोगानं दिली असल्याचं महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सांगितलं. रविवारी लोकमान्य टिळक रुग्णालयाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी यासंदर्भातली माहिती सांगितली आहे. 

शीव रुग्णालयातील कोरोनाबाधितांवर उपचार सुरु असलेल्या कक्षात जाऊन रुग्ण आणि रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांची पालिका आयुक्त चहल यांनी रविवारी भेट घेऊन विचारपूस केली. शीव रुग्णालयातील रुग्ण तसंच रुग्णालयाची स्थिती कशी आहे, याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी येथे आलो असून कोरोनावर मात करण्यासाठी पालिकेच्या रुग्णालयांनी सिंहाचा वाटा उचलला असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

कोरोनाबाधित रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतर त्यांच्या काय अपेक्षा आहेत, आरोग्य सुविधांमध्ये काय सुधारणा करणं आवश्यक आहे. हे त्यांच्याकडून जाणून घेता आलं असल्याचं चहल यांनी सांगितलं. 

यावेळी आयुक्तांनी रुग्णालयाच्या शवागारात जाऊन निर्धारित केलेल्या प्रणालीप्रमाणे काम होत आहे का की नाही, याची सुद्धा पाहणी केली. मुंबईकरांनी पहिल्या तिन्ही लॉकडाऊनच्या काळात जसं सहकार्य केलं त्याचप्रमाणे सहकार्य यापुढे देखील केल्यास कोरोनावर निश्चितपणे मात करु, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मुंबईत सध्या दुसऱ्या जिल्ह्यातील डॉक्टर मोठ्या संख्येनं येताहेत त्यामुळे डॉक्टरांची कोणत्याही प्रकारची कमतरता नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

कोरोनाच्या काळात खासगी रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयातील अतिदक्षता कक्ष पालिकेला वापरण्यास मुभा दिली आहे. त्यामुळे तिथल्या खाटा मोठ्या संख्येनं वापरण्यास मिळणार असल्याचं आयुक्तांनी सांगितलं. तसंच अतिदक्षता विभागामध्ये कॅमेरे लावून कंट्रोल रुमद्वारे नियंत्रण करणं शक्य आहे का? याची पाहणी केल्याचंही त्यांनी म्हटलंय.

केंद्र सरकारनं दिलेल्या निर्देशानुसार पालिकेकडून काम सुरु करण्यात आलं असून त्यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे सात दिवसानंतर रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला तर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. यामुळे अधिक खाटा उपलब्ध होण्यास हातभार लागणार असल्याचं सांगत, येत्या मंगळवारपासून वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदान कोरोनाबाधित रुग्णांसाठी वापरण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

good news for mumbaikar doubling rate of mumbais corona patients is almost fifteen days

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Budget 2026 : निर्मला सीतारामन किती वाजता बजेट सादर करणार? बजेट कुठे पाहता येईल? जाणून घ्या सर्व माहिती

IND vs NZ: सूर्यकुमार यादवचा विश्वविक्रम! विराट - रोहितलाही मागे टाकत T20I मध्ये रचला नवा इतिहास

PAK vs AUS: अरे हा फेकाड्या आहे! पाकिस्तानी गोलंदाजावर भडकला कॅमेरून ग्रीन, ICC ला दिसत नाही का? Video Viral

IND vs NZ, T20I: इशान किशनचं वादळ घोंगावलं! न्यूझीलंडविरुद्ध कोणालाच न जमलेला पराक्रम केला

Break-Free Toll Plaza : देशातील पहिला ‘ब्रेक फ्री’ टोल प्लाझा ‘या’ राज्यात झाला तयार! ; २ फेब्रुवारी पासून चाचण्या सुरू

SCROLL FOR NEXT