मुंबई

वरळी कोळीवाड्यातल्या नागरिकांसाठी 'मोठी' आनंदाची बातमी, पालिकेनं घेतला 'हा' निर्णय

सकाळवृत्तसेवा

मुंबई- कोरोना व्हायरसनं मुंबईतल्या सर्वात दाट लोकवस्ती असलेल्या भागात म्हणजे वरळी कोळीवाड्यात शिरकाव केल्यानंतर सगळीकडेच भीतीदायक चित्र उभं राहिलं. वरळीत कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर पालिकेनं तात्काळ हा परिसर सील केला आहे. गेल्या 45 दिवसांपासून वरळी कोळीवाड्यावर विशेष लक्ष देण्यासाठी ऍक्शन प्लॅन आखला होता. दरम्यान आता वरळी कोळीवाड्यातल्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. या भागातील काही इमारती आणि रस्ते सोडून इतर भागात असलेलं प्रतिबंध महापालिका शिथिल करणार असल्याची माहिती मिळतेय. अशाप्रकारचं पत्र जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी पोलिसांना लिहिलं आहे. जर असं झाल्यास या भागातल्या लोकांना आता थोडा मोकळा श्वास घेता येणार आहे. 

काय म्हटलंय पत्रात 

या पत्रात म्हटलं आहे की, 16 जागा सोडून इतर भागातील प्रतिबंध कमी करणार आहे. त्यामुळे या पुढे या भागता इतर भागाप्रमाणेच लॉकडाऊन असणार आहे. फक्त संपूर्ण कोळीवाडा सील नसेल. गेल्या 45 दिवसांपासून या भागातल्या लोकांना घराबाहेर पडण्यास सुद्धा मनाई केली होती. केवळ केवळ औषध घेण्यासाठी किंवा महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांसाठी घरातील एका व्यक्तीला घरा बाहेर पडता येत होतं. त्यामुळे अंत्यत बिकट परिस्थितीत 45 दिवस काढल्यानंतर नागरिकांना काही अंशी दिलासा मिळणार आहे. 

यात राम सिंग चाळ, जनसेवा बाळवाडी, गोल्फा देवी मंदिर, क्रांती गल्ली, हिरा शेठ चाळ, अमर प्रेम चौक पारवडी गल्ली, गोंदेकर हाऊस, सोनापूर लेन, गोल्फा देवी मंदिर मागची बाजू, नवसाई क्रीडा मंडळ, तरे गल्ली, मातोश्री हाऊस, मातृछाया निवास, बाळा पाटील हाऊस या 16 जागा वगळता इतर भागात हे निर्बंध कमी करण्यात आल्याचं समजतंय. 

वरळी कोळीवाड्यातील ऍक्शन प्लॅन यशस्वी

कोरोनाचे संशयित रुग्ण आढळल्याने पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून वरळी कोळीवाडा परिसर मुंबई पोलिसांनी सील केला. या परिसरात कर्फ्यू लावण्यात आला होता. त्यानंतर प्रशासनानं तिथे अॅक्शन प्लॅन जारी केला आणि तोच आता यशस्वी झाल्याचं दिसतंय.

good news for the people who are staying in contentment area of worali kolivada

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT