मुंबई

#Positive "ऑपरेशन मुस्कान'मुळे 10 हजार बालकांची घरवापसी 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : रेल्वे पोलिसांच्या "ऑपरेशन मुस्कान' मोहिमेंतर्गत तीन वर्षांत 10 हजार 149 बालकांची घरवापसी करण्यात आली आहे. रेल्वेस्थानकांतील अनाथ आणि बेघर मुलांना स्वकियांकडे सोपवून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवण्यासाठी रेल्वे पोलिसांनी "ऑपरेशन मुस्कान' मोहीम राबवली होती. त्याला चांगलेच यश आल्याने चिमुरड्यांना आधार मिळाला आहे. 

कुणी कुटुंबातल्या जाचाला कंटाळून; तर कुणी मुंबईच्या रुपेरी आकर्षणापोटी लहान वयातच घरातून पळ काढतात. घर सोडलेली मुले कधी भिकाऱ्यांच्या टोळीच्या हाती लागतात. कधी व्यसनाधीन होतात. कधी बालकामगार म्हणून त्यांना राबवले जाते. कधी तर त्यांचे लैंगिक शोषणही होते.

रेल्वेस्थानकांतील भटक्‍या आणि अनाथ मुलांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबियांकडे पुन्हा पाठवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी रेल्वे पोलिसांना दिले. त्यानुसार रेल्वे पोलिस आयुक्तालयाकडून 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2019 दरम्यान "ऑपरेशन मुस्कान' मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. मोहिमेंतर्गत मुंबईतील रेल्वेस्थानकांतून 643 अनाथ मुलांना ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी 481 अल्पवयीन बालकांना त्यांच्या पालकांकडे सुखरूप सोपवण्यात आले. उर्वरित 162 मुलांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. 
तीन वर्षांत मुंबई रेल्वे पोलिस हद्दीत अनाथ आणि बेघर अशी 10 हजार 355 बालके सापडली. त्यापैकी 10 हजार 149 बालकांना त्यांच्या पालकांकडे सोपवण्यात यश आले. 206 बालकांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली, असे रेल्वे पोलिस आयुक्तालयाकडून स्पष्ट करण्यात आले. 

देशभरातील अनेक राज्यांतून लहान मुलांचे अपहरण करून त्यांना मुंबईत आणले जाते. लहान मुलांना भीक मागण्यासाठी पाठवले जाते. त्यामुळे लहान मुलांना भीक देऊ नये. संशयास्पद बालके आढळल्यास त्याची माहिती त्वरित रेल्वे पोलिसांना द्यावी, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले. 

संशयास्पद बालके दिसल्यास हेल्पलाईन क्रमांक ः 1512 
व्हॉट्‌सऍप क्रमांक ः 8425099991 आणि 9594899991. 

वर्ष   विनापालक मुले पालकांच्या ताब्यात दिलेली बालके बालगृहातून पालकांच्या ताब्यात दिलेली बालके इतर राज्यात
पाठवलेली बालके
२०१७ ४५५८ ४१३५ ४२५  ९०
२०१८ २५७० २१२४ ४४६ १९७
२०१९ ३२२७  १७२९ १२९२ १६८


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताने गमावली तिसरी विकेट, रिंकू सिंग स्वस्तात झाला आऊट

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT