मुंबई

गुगलनं आणलं "किचन इमोजी"! कसं वापरता येईल? जाणून घेण्यासाठी क्लिक करा!

सकाळ वृत्तसेवा

दिवसरात्र सोबत असणारा स्मार्टफोन आपल्या जिवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. स्मार्टफोनमुळे आपण असंख्य लोकांच्या संपर्कात राहतो. त्यामुळे यावेळी दिवसभर संभाषण करताना अनेक इमोजी वापरत असतो. संभाषण करताना इमोजींचा वापर केल्यास त्याचा अनुभव आनंददायी असतो. त्यामुळे तुमचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी गुगलने नवं फीचर आणलं आहे. या फीचरला "इमोजी किचन" असे नाव देण्यात आले आहे. 

आपण दिवसभर आपल्या वेगवेगळ्या मेसेंजरद्वारे मित्रमैत्रिणींशी गप्पा मारत असताना भरपूर इमोजींचा वापर करतो. अनेकांना तर प्रत्येक प्रत्येक मेसेजमध्ये इमोजी वापरण्याची सवय असते. त्याने गप्पा रंगतदार होत असतात. त्यामुळे गुगलने तुमच्यासाठी विशेष फीचर सुरू केलं आहे. या फीचर द्वारे तुम्ही तुमच्या आवडीचे इमोजी कस्टमाइज करू शकता. यामध्ये तुम्हाला आवडणारे एकापेक्षा जास्त इमोजी तुम्ही मर्ज करु शकता. हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये जाऊन जी बोर्ड अपडेट करावे लागणार आहे. एकदा जी बोर्ड अपडेट झाले की,  तुम्ही या नव्या फीचरचा आनंद घेऊ शकता. मेसेज करताना त्या त्या परिस्थितीनुसार इमोजीचा वापर केल्या संवादाचा आनंद अधिक वाढतो. हे अपडेट आयओेएस, अन्ड्राईड या ऑपरेटिंग सिस्टीम वर उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी आहे का? तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय केलं होतं भाकित? खरं काय जाणून घ्या

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

Mangalevedha Basaveshwar Memorial News: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी सह्यांची लाट; एका दिवसात 1040 नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

SCROLL FOR NEXT