mangrove
mangrove sakal media
मुंबई

गोराईत कांदळवन संवर्धन केंद्रासोबत उद्यानाची उभारणी होणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई कांदळवन (Mangroves) संधारण विभागाने गोराई (Gorai) येथे कांदळवन संवर्धन केंद्र आणि कांदळवन उद्यान (Kandalwan Garden) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी २६.९७ कोटी रुपयांचा (project expenses) खर्च होणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील (international level) हे केंद्र जानेवारी २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नागरिकांना कांदळवन परिसंस्थेच्या महत्त्वाची जाणीव करून देणे, समाजातील विविध घटकांना कांदळवनांकडे आकर्षित करणे, हा या प्रकल्प उभारण्यामागील उद्देश आहे.

बोरिवलीमधील गोराई येथे सीटीएस क्र. ८८३ मध्ये हा कांदळवन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. येथील उद्यानात निसर्ग पर्यटन केंद्र, विविध विराम बिंदूंसह कांदळवन उन्नत मार्ग, पक्षी निरीक्षण मनोरा, कायक ट्रेल मँग्रोव्हज ट्रैलद्वारे पॉज पॉईंट्सला जोडले जाणार आहेत. कांदळवन उद्यानाबाबत माहिती देण्यासाठी ॲपद्वारे गंतव्य (डेस्टिनेशन) माहिती प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. यामध्ये मॅंग्रोव्हज परिसंस्थेमधील वनस्पती आणि प्राण्यांवर आभासी वास्तविकतेतील माहितीसह स्पर्श आधारित माहिती प्रणालीमार्फत जनजागृती करण्यात येईल.
कांदळवन उन्नत मार्ग हा ८०० मीटर लांबीचा असून, हा मार्ग पर्यटकांना थेट खारफुटींमध्ये नेण्यासाठी प्रस्तावित आहे.

या प्रकल्पाला महाराष्ट्र राज्य इको-टुरिझम मंडळाने मान्यता दिली आहे आणि ‘इको टुरिझम प्रकल्प’ म्हणूनही घोषित केले आहे. या प्रकल्पाला पर्यावरण विभागाने सीआरझेड मंजुरी दिली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याच्या नियोजन विभागाकडून या प्रकल्पासाठी निधी दिला जात आहे. आयआयटी मुंबईची या प्रकल्पासाठी तृतीय-पक्ष तांत्रिक लेखापरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

"मुंबई हे एकमेव महानगर आहे, ज्यात ५० किलोमीटरपेक्षा जास्त खारफुटीचे जंगल आहे. आम्ही त्याच्या संवर्धनासाठी आणि या नैसर्गिक संपत्तीबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहोत. हे ध्येय पुढे नेऊन, आम्ही पहिल्याच कांदळवन उद्यानाचे काम गोराईत सुरू केले. कांदळवन अभ्यासकांसोबत पर्यटकांसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे."

- आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर हळहळलं! खरेदीसाठी गेल्या जवानांवर काळाचा घाला, भीषण अपघातात दोंघाचा मृत्यू; ऑटोचालकासह सहा जवान गंभीर जखमी

Shikhar Dhawan: लेकाच्या विरहानं शिखर व्याकुळ; फादर्स डेच्या शुभेच्छा देताना म्हणाला, 'त्याच्याशी बोललो नाहीये...'

Jerusalem : दिवसाउजेडी हल्ले थांबवणार; गाझातील मदतकार्याच्या सोयीसाठी इस्राईलकडून घोषणा

Russia-Ukraine Conflict : ‘युक्रेन’बाबत स्वित्झर्लंडमध्ये बैठक; रशियाच्या अनुपस्थितीने तोडग्याची शक्यता कमीच

Prataprao Chikhlikar: मनोज जरांगेंची हवा नांदेडपर्यंत...! प्रतापराव चिखलीकरांचा गेम कसा झाला?

SCROLL FOR NEXT