मुंबई

गोरेगावच्या नेस्को जंबो कोविड सेंटरला मिळणार 1500 बेड्स

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता गोरेगाव येथील नेस्को जंबो कोविड सेंटर येथे आणखी दीड हजार रुग्णांच्या उपचारासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नुकतेच या केंद्राला भेट देऊन आढावा घेतला. यावेळी डॉ. नीलम अंद्रादे यांनी रुग्णांचा औषधोपचार, प्रवेश, जेवण व साफसफाई तसेच ऑक्सिजन व इतर औषधांचा पुरवठा याबाबत माहिती दिली. तसेच रुग्णांच्या रक्त तपासणीबाबत थायरोबेअर चाचणी केंद्राशी झालेला करार याबाबत माहिती दिली. दरम्यान, या कोविड सेंटरला डीआर सिस्टिम व एक्सरे मशिन-सीआर सिस्टिम या यंत्रांची व्यवस्था झाल्यास रुग्णांची गैरसोय दूर होईल असं समजल्यानंतर आमदार निधीतून दोन्ही मशिन्स देण्याचे सुभाष देसाई यांनी मान्य केले. तसेच लवकरात लवकर या मशिन्स रुग्णसेवेसाठी नेस्को सेंटरला सुपूर्द केल्या जातील असेही सांगितले.

मुंबईतील रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे नेस्को संकुलात वाढीव 1500 बेड्स कार्यान्वित करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहेत. यापैकी 500 बेड्स ऑक्सिजन सुविधेसह सुसज्ज असतील. 15 एप्रिलपासून सर्व बेड्स कार्यान्वित करण्याचे आश्वासन महापालिका अधिकाऱ्यांनी दिले. सध्या उपलब्ध असलेल्या 2 हजार 900 खाटांसह एकूण 4300 रुग्णांची या एकाच संकुलात ठेवण्याची सोय होऊ शकणार नाही.

रेमेडेसिवीर औषधाचा पुरेसा साठा असून अधिक सुमारे 1000 व्हायल्स आजच उपलब्ध होत आहेत. तसेच जम्बो सिलिंडर व आयनॉक्स टाक्यांमध्ये पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध आहे. डॉक्टर, नर्सेस व वॉर्डबॉय नेमले असून या आठवड्यात यात भर पडत आहे. अतिदक्षता विभागातील सुविधाही वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिसरातील स्वच्छता, शौचालयांची साफसफाई व गरम पाण्याच्या सोयीचेही निरिक्षण करण्यात येऊन आवश्यक खबरदारी घेयाच्या सूचना देसाई यांनी दिल्या.

नेस्को संकुलात आतापर्यंत 1 लाख 17 हजार व्यक्तिंचे लसीकरण झाले असून मागील आठवड्यातील लसीकरणाचा पुरवठ्यातील खंड आता भरुन निघाला असून दररोज 6 हजार व्यक्तिंचे लसीकरण पूर्ण केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT