Mumbai Metro  

Esakal

मुंबई

Mumbai Metro: ‘मेट्रो ११’ला सरकारची मंजुरी! १४ स्थानकांचा समावेश, वाचा सविस्तर

Metro 11: मुंबईतील मेट्रो ४चा विस्तारित भाग असलेल्या आणिक डेपो-वडाळा-गेटवे ऑफ इंडियापर्यंतच्या मेट्रो मार्गाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या मार्गिकेमुळे मुंबईकरांची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील मेट्रो ४चा विस्तारित भाग असलेल्या आणिक डेपो-वडाळा-गेटवे ऑफ इंडियापर्यंतच्या (मेट्रो ११) तब्बल १७ किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित मेट्रो मार्गाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यानुसार या मार्गावर १३ भुयारी आणि एक उन्नत अशी एकूण १४ स्थानके असणार आहेत. तसेच २३ हजार ४८७ कोटींचा खर्च होणार आहे.

मुंबई मेट्रो-११ ही मूलतः मुंबई मेट्रो-४चा (वडाळा-ठाणे-कासारवाडवली) विस्तार म्हणून वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी नियोजित होती. त्या वेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनमार्फेत (डीएमआरसी) प्रकल्प अहवाल तयार केला होता; मात्र हा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा, म्हणून भुयारी मेट्रो उभारण्याचा अनुभव असलेल्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडे दिला होता.

दरम्यान, या प्रकल्पाच्या मार्गिकेचे पुनर्निरीक्षण करून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमार्फत मार्गिकेचे आणिक डेपो, वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया असे सुधारित संरेखन करून सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल ‘डीएमआरसी’कडून तयार करून घेतला आहे. त्यामध्ये १३ भूमिगत आणि भू-समतल स्थानकाचा समावेश असलेल्या एकूण १७.५१ किलोमीटर लांबीच्या आणि २३ हजार ४८७ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे भविष्यात आणिक डेपो, वडाळा परिसरातून फोर्ट परिसरात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मुंबईकरांची कोंडी सुटणार

मेट्रो ११ आणिक डेपो ते गेटवे ऑफ इंडिया या मार्गिकेमुळे मुंबईकरांची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. आणिक आगर, वडाळा ट्रक टर्मिनल, सीजीएस कॉलनी, गणेश नगर, बीपीटी रुग्णालय, शिवडी, वाडी बंदर, दारुखाना, भायखळा, नागपाडा, भेंडी बाजार, महात्मा ज्योतिबा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट), हॉर्निमन सर्कल आणि गेटवे ऑफ इंडिया ही सर्व ठिकाणे या मार्गिकेला जोडली जाणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्यांना चांगलाच फायदा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT