मुंबई

अखेर महापोर्टल बंद होणार; महाभरतीचे काम नव्या संस्थेला देण्यासाठी कार्यवाही सुरू

सकाळवृत्तसेवा

मुंबई : तत्कालिन फडणवीस सरकारने नोकरभरती साठी निवडलेल्या महापोर्टल मधे सावळागोधळ असल्याच्या तक्रारी आल्यानंतर हे महापोर्टल रद्द करून नव्याने सुधारणा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आज याबाबतची कार्यवाही सुरू करण्याचा आदेश सरकारने जाहिर केला. 

राज्य शासनातील गट 'क' व 'ड' च्या पदभरतीसाठी महापोर्टल ऐवजी  नव्या संस्थेची निवड करण्याचा शासन आदेश सरकारने झाहिर केला. महाविकास आघाडी सरकारच्या महाभरतीसाठी  महाआयटी मार्फत  नव्या संस्थेची निवड करण्याचे आदेश सरकारने जाहिर केले. 

महापोर्टलबाबत आलेल्या तक्रारीनंतर महाविकास आघाडी सरकारचा हा निर्णय तत्कालिन फडणविस सरकारच्या निर्णयाला धक्का मानला जात आहे. महापोर्टलच्या माध्यमातून फडणविस सरकारने नोकर भरतीचा मेगा कार्यक्रम सुरू केला होता. पण तलाठी भरतीसह इतर नोकरभरतीत महापोर्टलच्या कार्यपध्तीवर शाकडो तक्रारी दाखल झाल्या होत्या. महापोर्टल ची भरती प्रक्रिया सदोष असल्याचे अनेक उमेदवारांचे मत होते. त्यामुळे हे महापोर्टल रद्द करण्याची मागणी घेवून राज्यभरात आंदोलन सुरू होते.

खासदार सुप्रिया सुळे यांनीही महापोर्टल रद्द करून नव्याने सुधारणा करण्याची मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानुसार सुरूवातीला महापोर्टल च्या माध्यमातून होणार्या नोकरभरतीला महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली होती. आज सरकारने काढलेल्या आदेशात महापोर्टलला सकम व पारदर्शक पध्दतीने नोकरभरती करणारा नविन पर्याय शोधण्याचे आदेश महाआयटी विभागाला दिले आहेत. 

government issued direction to shut mahaportal recruitment will be done by new organisation  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT