File Photo 
मुंबई

सरकारला कारवाईसाठी हवी  आणखी सहा महिन्यांची मुदत 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सभासदांची बनावट नोंदणी करून अपहार करणाऱ्या 82 मागासवर्गीय सहकारी औद्योगिक संस्थांच्या विरोधात राज्य सरकारने कारवाई सुरू केली आहे. या कारवाईसाठी आणखी सहा महिन्यांची मुदत देण्याची मागणी राज्य सरकारने शनिवारी मुंबई उच्च न्यायालयाकडे केली.

सभासदांची बनावट नोंदणी करणाऱ्या मागासवर्गीय सहकारी औद्योगिक संस्थांवर कारवाई करण्याचा इशारा उच्च न्यायालयाने सहा महिन्यांपूर्वी दिला होता. या संस्थांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते विजय सनदी यांनी ऍड्‌. धैर्यशील सुतार यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जनहित याचिका केली आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी जानेवारीत होईल. 

राज्यातील एकूण 82 संस्थांपैकी कोल्हापूर जिल्ह्यातील 42 संस्थांच्या विरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. या संस्थांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, नोंदणी रद्द करण्याचा विचार सुरू असल्याचे राज्य सरकारने न्यायालयाला सांगितले. यापैकी नऊ संस्थांच्या कारवाईबाबत अहवाल देण्यात आला असून, उर्वरित संस्थांची तपासणी सुरू आहे. 

मागील वर्षी मे महिन्यात पुण्याच्या सहायक आयुक्तांनी पाहणी करून अहवाल दिला होता. गैरव्यवहाराचा आरोप असलेल्या 82 संस्थांवर कारवाईची आणि अवसायक नेमण्याची सूचना अहवालात करण्यात आली होती. त्यावर कारवाई करण्यात आली नाही, असे याचिकादाराचे म्हणणे आहे. बनावट सदस्यांद्वारे कागदोपत्री संस्था स्थापन केल्या आणि अनुदान मिळवले असा आरोप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Orange Cap : संजू सॅमसन गरजला! ख्रिस गेलचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, ऑरेंज कॅपच्या शर्यतीत निर्णायक वळण

IPL 2026 Point Table: संजू सॅमसनची मॅच विनिंग खेळी! ७ चौकार, ६ षटकारासह ८७ धावा; चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीत कायम, दिल्लीचं काय?

West Bengal : ममतांचा राजीनाम्यास नकार, भाजपचा मुख्यमंत्री कसा होणार? राज्यपालांकडे काय पर्याय?

पर्वती पायथ्याला ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, नागरिक संतप्त; संशयिताला अटक, घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात

जुना बोरामणी नाका ‘ब्लॅक स्पॉट’! रुग्णाचे रक्ताचे नमुने घ्यायला जाताना रक्तपेढीचा कर्मचारी ठार; 1 वर्षाच्या मुलीचा 3 दिवसांपूर्वीच झाला होता वाढदिवस

SCROLL FOR NEXT