Mumbai High Court Sakal media
मुंबई

"राज्य सरकारने भेदभाव करुन लस न घेणाऱ्यांना रेल्वे प्रवासाची संधी नाकारली"

सुनिता महामुनकर

मुंबई : कोरोना प्रतिबंधक लसीचे (corona vaccination) दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे गाडीमधून प्रवास करण्याची परवानगी (train permission) देण्याचा राज्य सरकारचा (government decision) निर्णय मनमानी (wrong decision) आहे, असा आरोप करणारी आणखी एक याचिका (petition) मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai high court) करण्यात आली आहे.

राज्य सरकारने लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करण्याची मुभा दिली आहे. मात्र यामुळे लस न घेतलेल्या नागरिकांच्या मूलभूत समानतेच्या अधिकारांवर बाधा येत आहे असा दावा योहान टेंग्रा यांनी केला आहे. टेंग्रा वैद्यकीय सल्लागार असून वकील अभिषेक मिश्रा यांच्या मार्फत त्यांनी याचिका केली आहे. केंद्र सरकारने लस घेणे ऐच्छिक ठेवले आहे. त्यामुळे कोरोना विरोधी लस घेतलेले आणि न घेतलेले समान आहेत.

जी व्यक्ती या आजारातून बरी झाली आहे ती अधिक प्रतिबंधक असते आणि तिच्या पासून धोका कमी असतो, असे याचिकेत म्हटले आहे. राज्य सरकारने मनमानी पध्दतीने आणि भेदभाव करून लस न घेणाऱ्यांना रेल्वे प्रवासाची संधी नाकारली आहे, असे याचिकादाराने म्हटले आहे. पुढील आठवड्यात यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठबोरवाला यांनी याच मुद्यावर रिट याचिका केली आहे. लोकांना प्रवास नाकारुन त्यांच्या नोकरी धंद्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत आहे, असा दावा केला आहे. राज्य सरकारने दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवास करण्यासाठी ता. 10 आणि 11 औगस्ट रोजी निर्णय घेऊन परवानगी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Attack: होर्मुझमधील तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यात 2 भारतीय खलाशी बेपत्ता

Kankavli Police Constable Death : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिला पोलिस हवालदाराचा जंगलात आढळला मृतदेह; झाडाला घेतलेला गळफास, तिचा नवरा आहे पोलिस दलात...

सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार ही गाजलेली नायिका; 'वहिनीसाहेब' बनून प्रेक्षकांच्या मनावर केलेलं राज्य, कोण आहे ती?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

Uttarakhand: चीन-नेपाळ सीमेवरील जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची नवी संधी; पहिल्या वर्षी ५० एमबीबीएस जागा

SCROLL FOR NEXT