खोपोली : खालापूर तालुक्यातील चौकपासून मराठ्यांच्या शौर्याची साक्ष देणाऱ्या उंबरखिंडीपर्यंतच्या परिसरातील हजारो शिवप्रेमींच्या अंगात आज वीरश्री संचारली होती. "शिवाजी महाराज की जय...' अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. निमित्त होते विजयी दिनाचे. 1661 मध्ये याच दिवशी मराठ्यांच्या फौजांनी उंबरखिंडीत करताब खान याला पराभवाची धूळ चारली होती. सरनौबत नेताजी पालकर यांच्या चौक या जन्मगावातून मशाल यात्रा काढून शेकडोंनी विजयी वीरांना मानवंदनाही दिली.
शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळा, खालापूर पंचायत समिती आणि ग्रामपंचायत चावणी यांच्या वतीने 358 वा विजयदिन सोहळा चावणी उंबरखिंड येथे झाला. शिस्तबद्ध आणि पारंपरिक खेळांबरोबर विविध कार्यक्रम यानिमित्ताने झाले.
शालेय विद्यार्थ्यांनी कार्यक्रमांतून छत्रपती शिवाजी महाराज आणि नेताजी पालकरांच्या पराक्रमाची माहिती दिली. विजयी गीते सादर करण्यात आली. त्याचबरोबर पारंपरिक नृत्य सादर करण्यात आले.
खालापूर, पाली, पेण तालुका आणि सरनौबत नेताजी पालकर यांच्या चौक गावातील शेकडो शिवप्रेमीही आवर्जून उपस्थित होते. आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात सरसेनापती नेताजी पालकर यांच्या जन्मस्थान चौकपासून समरभूमी उंबरखिंड छावणीपर्यंत विशाल मशाल फेरी काढण्यात आली. शिवव्याख्याती रसिका गणेश सणस (वरुडकर) यांनी शिवचरित्रावर व्याखान सादर केले. कार्यक्रमाला माजी आमदार देवेंद्र साटम, नगरसेवक संकेत भासे आदी उपस्तित होते.
काय आहे इतिहास...
2 फेब्रुवारी 1661 रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि नेताजी पालकर यांनी मोजक्या मावळ्यांसह समरभूमी उंबरखिंडीत करतलब खानच्या 35 हजारांच्या फौजेवर हल्ला चढवला होता. या मोठ्या विजयानिमित्त विजयदिन साजरा करण्यात येतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.