Groundnut cultivation  
मुंबई

लहरी पावसामुळे भातपिकाला छेद, भिवंडीत प्रथमच भुईमुगाच्या शेतीचा प्रयोग 

शरद भसाळे

भिवंडी : ठाणे जिल्ह्यातील बहुतांश भागात भाताचे पिक घेतले जाते. मान्सूनच्या पावसावर केली जाणारी ही शेती निसर्गाच्या लहरीपणामुळे आता अनिश्‍चित स्वरुपाची झाली आहे. त्यामुळे या पारंपरिक भातशेतीला छेद देत भिवंडीतील पहारे गावचे शेतकरी दीपक भोईर यांनी कृषी तज्ज्ञांकडून मातीची तपासणी करून घेत आपल्या दीड एकर हळव्या भातशेतीमध्ये प्रथमच भुईमुगाच्या शेतीचा प्रयोग केला आहे. 7 जून रोजी पेरणी केलेल्या भुईमुगाची झाडे बहरली असून ऑक्‍टोबर महिन्यात उत्पन्न हाती येण्याची अपेक्षा भोईर यांना आहे. 

भिवंडी तालुक्‍यात पाण्याच्या टंचाईमुळे बहुतांश शेती ही मान्सूनच्या पावसावर अवलंबून असते. जास्त पाऊस पडल्यास ओला दुष्काळ, तर पावसाने ओढ दिल्यास कोरडा दुष्काळ, असा पाठ शिवणीचा खेळ सुरू असतो.

गेल्या तीन वर्षांपासून येथील शेतकरी निसर्गाच्या दुष्टचक्रात सापडल्याने हातातोंडाशी आलेले हातचे भातपीक निघून जात आहे. त्यातच शेतमजूर मिळत नसल्यामुळे मोठी मेहनत करूनही येथील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नाही. त्यातच कोरोनामुळे लॉकडाऊन पुकारल्याने या काळात बहुसंख्य शेतकरी कर्जबाजारी सुद्धा झाले आहेत. 

अशा परिस्थितीत पहारे गावातील तरुण शेतकरी दीपक भोईर याने भुईमुगाच्या शेतीचा पहिला प्रयोग हाती घेतला आहे. त्यासाठी त्यांनी ग्रामसेवक गणेश जाधव यांचा सल्ला घेऊन कृषी प्रयोग केंद्रातून प्रथम मातीची तपासणी करून घेतली. त्यानंतर उच्च प्रतीचा भुईमूग लावला आहे.

सदरचे भुईमुगाचे पीक टवटवीत आले असून जमिनीखाली भरगच्च अशा शेंगा लागण्यास सुरुवात झाली आहे. दीड एकर जमिनीमध्ये भुईमुगाची शेती लावली असून सुमारे 15 क्विंटल भुईमूग निघेल, अशी अपेक्षा दीपक यांना आहे. दरम्यान, तालुक्‍यातील भुईमुगाच्या शेतीचा पहिलाच प्रयोग असल्याने परिसरातून भोईर यांचे कौतुक करण्यात येत आहे. 

दीड एकरासाठी 17 हजार खर्च 

  • भुईमुगाची पेरणी केल्यानंतर आतापर्यंत फक्त दोन वेळा खत देण्यात आले असून त्यामध्ये 50 किलो युरिया व 50 किलो जिप्सम देण्यात आल्याची माहिती दीपक भोईर यांनी दिली. आतापर्यंत दीड एकर भुईमुगाच्या शेतीसाठी 17 हजार रुपये खर्च आला असून सुमारे एक लाख रुपयांचे उत्पन्न दीपक यांना अपेक्षित आहे.
  • पिकाची उत्तम वाढ होत असल्याने संपूर्ण शेती हिरवीगार झाली आहे.या पिकाची विचारणा करण्यासाठी आजूबाजूचे शेतकरी आवर्जून येत आहेत. यंदा पीक चांगले आल्यास पुढच्य वर्षीही शेतामध्ये भुईमुगाची पेरणी करणार, अशी मनोधारणा त्यांनी व्यक्त केली.  

----------

(संपादन ः प्रणीत पवार)

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT