मुंबई

दिव्यांगाचे बाणेदार उत्तर... माझ्यापेक्षा गरिबांना मदत करा!

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनाच्या फैलावामुळे एकीकडे मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणारी समाजातील माणसे दिसून येत आहेत, पण दुसरीकडे नशिबी अपंगत्व येऊनही माणुसकी  न सोडलेली देवमाणसेही वावरत आहेत. आपली परिस्थिती बिकट असूनही माझ्यापेक्षा गरिबांना मदत द्या, असे सांगून नम्रपणे मदत नाकारणारे दिव्यांग बाळकृष्ण दवे यांच्यासारखे ताठ कण्याचे अनेक स्वाभिमानी नागरिक त्याचीच प्रचीती देतात... 

महत्त्वाचे : चेक फ्राॅम होम... एकाच क्लिकवर डाॅक्टरांकडून उपचार

दहिसरच्या अस्मिता अपंग चिकित्सा व पुनर्वसन केंद्रामार्फत अनेक दिव्यांग व्यक्तींना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी मदत केली जाते. येथे अपंग व्यक्तींची तपासणी करून त्यांच्यावर काय उपचार करायचे, ते सुचवले जाते व त्यासाठी पुढील मदतही केली जाते. त्यानंतर अपंगांना आपल्या पायावर उभे राहता यावे यासाठी त्यांना रोजगार प्रशिक्षण दिले जाते व सरकारी योजनांचा आधार घेऊन त्यांच्या चरितार्थाची सोय केली जाते. या केंद्रातून आतापर्यंत अशा शेकडो विद्यार्थ्यांना रोजगाराची साधने मिळवून देण्यात आली आहेत. 

सध्या कोरोनाच्या फैलावामुळे केंद्राच्या प्रमुख सुधा वाघ तसेच अन्य प्रशिक्षक, केंद्रातून शिकून गेलेल्या अपंगं विद्यार्थ्यांची चौकशी करतात व त्यांना काही मदत हवी का, हे देखील विचारतात. त्यानुसार स्वयंसेवी संस्थांच्या साह्याने या कुटुंबांना मदत देण्याची व्यवस्था केली जाते. अशाच चौकशीदरम्यान त्यांना बाळकृष्ण दवे (४४) यांची परोपकारी वृत्ती दिसून आली.

मी माझे कसेही निभावून नेईन...
पोलिओग्रस्त असलेल्या दवे यांना केंद्रातर्फे टेलिफोन बुथ सुरू करून देण्यात आला होता. मात्र, आता सार्वजनिक दूरध्वनी कोणी वापरत नसल्याने चरितार्थासाठी दवे यांना शिलाईचे काम शिकवण्यात आले. त्यावर त्यांनी आपला संसाराचा गाडा ओढण्यास सुरुवात केली. त्यातच मध्यंतरी त्यांच्या पत्नीला मोठे आजारपण झाले. सध्या त्यांचे वडील अर्धांगवायूमुळे अंथरुणावरच आहेत. त्यांना बेडपॅन देण्यापासून सारी सेवा बाळकृष्णच करतात. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे, तरी केंद्रातर्फे मदत विचारण्यात आल्यावर, मी माझे कसेही निभावून नेईन... माझ्यापेक्षा गरीब असलेल्यांना मदत करा, असे बाणेदार उत्तर बाळकृष्ण यांनी दिले. जवळच्यांकडून मदत घेतली तरीही ते बोलून दाखवतात. त्यामुळे आतापर्यंत घेतलेली साऱ्या मदतीची मी परतफेड केली आहे, असेही त्यांनी सांगितले. 

समाजाने आदर्श घ्यायलाच हवा
तीन मुलांचे शिक्षण, पत्नीला घरकामात मदत आदी कामे सांभाळून रोज सजावटीचे दागिने बनविण्याचे काम अशी धडपड बाळकृष्ण दवे करीत आहेत. अशा व्यक्तींचा आदर्श साऱ्या समाजानेच ठेवायला हवा, असेही सुधा वाघ म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

SCROLL FOR NEXT