मुंबई

मिशन बिगिन अगेन तर सुरु झालं पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील परिस्थिती गंभीर, कारण आहे...

सकाळवृत्तसेवा

मुंबई- महाराष्ट्रात कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 75 हजारहून अधिक झाली आहे. मुंबईतही कोरोनाचा सर्वाधिक प्रार्दुभाव आहे. महाराष्ट्रात मुंबई हे कोरोनाचं नवं केंद्र बनलं आहे. मुंबईतला रुग्णांचा आकडा उच्चांकावर जाऊन पोहोचला आहे. सद्यस्थितीत मुंबईत 44 हजार 704 कोरोना रुग्ण आहेत. पण आता धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. एकीकडे कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना मुंबईतील सर्व रुग्णालय संपूर्ण भरली असल्याची माहिती समोर आली आहे. 

मुंबईतल्या रुग्णालयात 9092 बेडची व्यवस्था आहे. यातील 94 टक्के म्हणजेच 8570 बेड रुग्णांनी खचाखच भरले आहेत. त्यामुळे एकीकडे रुग्णांचा वाढता आकडा आणि नव्या रुग्णांना ठेवायचं कुठे असाच प्रश्न आता पालिकेसमोर उपस्थित झाला आहे. 

दुसरीकडे 98 टक्के ICU बेड सुद्धा व्यापलेले आहेत. मुंबईत 1097 आयसीयू बेड उपलब्ध आहेत. त्यापैकी आता केवळ 1 बेड शिल्लकक आहे. कोविड केअरमध्येही अशीच भयंकर परिस्थिती आहे. कोविड केअरमध्य 61 टक्के बेड भरलेले आहेत. तिथे 7107 बेडची व्यवस्था केली आहे. मुंबईतल्या रुग्णालयात 85 टक्के व्हेंटिलेटर रुग्ण आहेत तर 74 टक्के ऑक्सिझन बेड भरलेत. 

ICU बेड्सची परिस्थिती अतिशय गंभीर 

महापालिकेच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत शहरातील 99% अतिदक्षता विभागातील बेड आणि 72% व्हेंटिलेटर व्यापलेले आहेत. धक्कादायक म्हणजे कोविड 19 वर ज्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत ती रुग्णालयं जवळपास 96 टक्के भरले आहेत. या आकडेवारीनुसार, मुंबईतल्या रुग्णालयामध्ये केवळ 1 टक्केच अतिदक्षता विभागातले बेड शिल्लक राहिलेत. 

रुग्णालयातल्या बेडची माहिती एका क्लिकवर 

पालिकेकडून रुग्णालयातल्या बेडसाठी डॅशबोर्ड तयार करण्यात येत असून दर अर्धा तासात रिकाम्या झालेल्या बेडची माहिती तिथे अपलोड होणार आहे. त्यामुळे रुग्णांना रुग्णालय आणि त्यातील बेडची माहिती ऑनलाईन मिळवणं शक्य होणार आहे. मुंबईत सध्या 75 हजार खाटा तयार असून त्यामध्ये सीसीसी 1 आणि डीसीएच यांच्या संख्या 44 हजार आहे. 

मुंबईत रुग्णवाहिकांचा तुटवडा लक्षात घेऊन रुग्णवाहिकांची संख्या वाढवत 456 करण्यात आली आहे. सर्व रुग्णवाहिकांच्या चालकांना पीपीई किट्स उपलब्ध करुन देण्यात आलेत. मुंबईतल्या 33 खासगी रुग्णालयांमध्ये 3 हजार 600 बेड नॉन कोविड रुग्णांसाठी तर 2 हजार 624 बेड कोविड रुग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेत.

health care system of mumbai is in crunch as corona patients if rising day by day

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : महाराष्ट्रातल्या राजुरा मतदारसंघात व्होटचोरी करून निवडून आला भाजप आमदार? राहुल गांधींनी आकडेवारीच मांडली

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : कर्नाटकमध्ये मतचोरी पकडल्याचे राहुल गांधी यांनी पुरावे केले सादर

Pune Crime : कोथरुडमध्ये गोळीबार; गाडीला साईड न दिल्याचा वाद की काहीतरी मोठं?

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT