मुंबई

मुंबईतील KEM रुग्णालयातील कर्मचारी संतापले, उपसलं काम बंद आंदोलनाचं हत्यार; जाणून घ्या नक्की प्रकरण काय आहे...

सकाळवृत्तसेवा

मुंबई - केईएम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. कोविड वॉर्डमध्ये काम करणार्या एका कर्मचार्याचा मृत्यू झाल्याने कर्मचार्यांमध्ये संतापाचे वातावरण असल्याने हे आंदोलन करण्यात आले आहे. 

रुग्णालय प्रशासनाकडून कर्मचार्यांसाठी कोणतीही सुविधा दिली जात नसल्याने अधिष्ठाता हेमंत देशमुख यांच्याविरोधात कर्मचाऱ्यांमध्ये रोष आहे. कर्मचारी काम करीत नाहीत असं विधान देशमुख यांनी केल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. याचविरोधात हे काम आंदोलन पुकारण्यात आले आहे. 

सर्व संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन आंदोलन सुरू केले आहे. सकाळी 9.30 वाजल्यापासून हे आंदोलन करण्यात आले आहे. आतापर्यंत कोविड रुग्णांचे मृतदेह ताब्यात घेणार्या कर्मचार्यांना कोणत्याही प्रकारची सुविधा किंवा पीपीई कीट्स पुरवले गेले नाहीत असा आरोप करत आतापर्यंत 7 शवागृहात काम करणारे कर्मचारी ही पॉझिटिव्ह आल्याचे ही कर्मचार्यांनी सांगितले आहे. 

शिवाय, मृतदेह ही तसेच पडून राहत आहेत. नातेवाईक ही मृतदेह ताब्यात घ्यायला तयार होत नाहित. अश्या परिस्थितीत सतत त्याच मृतदेहांमध्ये काम करावे लागते. शिवाय,अनेक नातेवाईक शवगृहाबाहेर फिरत राहतात. त्यातून संसर्ग पसरण्याची शक्यता असते. या सर्व परिस्थितीवर जोपर्यंत मार्ग निघत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरु राहणार असल्याचे ही कर्मचार्यांनी सांगितले आहे.

health workers of KEM starts agitation after one of their co worker lost his life

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rainfall Forecast Maharashtra : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? हवामान विभागाचा पुढील अंदाज चिंताजनक

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2026

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

SCROLL FOR NEXT