मुंबई : शहरातील कोविड नियंत्रणात सिंहाचा वाटा असलेल्या आरोग्य सेविकांना अद्याप जून महिन्याचे वेतन मिळालेले नाही. पालिकेच्या या योद्धा उपाशीपोटी काम करत आहेत. कोणतेही ठोस कारण नसताना पालिकेने हे वेतन दिलेले नाही असं यांचं म्हणणं आहे.
कोविडच्या संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने शोध, चाचणी आणि उपचार या त्रिसूत्रीचा अवलंब केला आहेत. यात शहरातील 3700 आरोग्य सेविकांचा महत्वाचा सहभाग असतो. वस्त्या, चाळी इमारतींमध्ये फिरुन या सेविका जनजागृती करण्याबरोबरच वैद्यकिय पथकाला चाचणीसाठी सहकार्य करणे, नागरीकांना केंद्रापर्यंत आणणे अशी कामे करत आहेत. फ्लू सदृष्य लक्षणं असलेले नागरीक शोधण्याचेही महत्वाचे काम त्या करत आहेत. वस्त्यामध्ये पायी फिरुन 20-25 मजल्याच्या इमारतीमध्ये चढ उतार करुन या सेविका नागरीकांपर्यंत पोहचत आहेत.
मोठी बातमी : महिलांपेक्षा पुरुषांना कोरोनाचा धोका अधिक; तर 'या' वयोगटातील कोरोनाग्रस्तांचे प्रमाण जास्त...
शिव ते मुलूंड या परीसरातील 1400 ते 1500 आरोग्य सेविकांना जूलै महिन्याअखेरीस वेतन मिळालेलं नाही. याबाबत माहिती मुंबई मनपा कार्यालयिन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश देवदास यांनी दिले. हे वेतन न मिळण्यासाठी प्रशासनाकडून ठोस कारणही दिले जात नाही. त्याबाबत आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनाही माहिती दिली आहे, असेही देवदास यांनी सांगितले.
नाहीतर आमच्यावर उपासमारीची वेळ येईल
या आरोग्य सेविका प्रामुख्याने हातावर पोट असलेल्या कुटूंबातील आहेत. लॉकडाऊनमुळे घरातील इतर सदस्यांचे रोजगार बंद पडले आहेत. "नवरा रिक्षा चालवतो. पण आता नेहमी सारखा व्यवसाय होत नाही. बचत होती ती रिक्षाचे हप्ते भरण्यात जातात. माझ्या वेतनावरच तीन महिने घर चालतंय. या महिन्यात वेतन मिळाले नाही तर उपासमारीची वेळ येईल, असे एका आरोग्य सेविकेने सांगितले.
कोण असतात आरोग्य सेविका ?
पालिकेच्या प्रत्येक आरोग्य केंद्रासाठी 20 आरोग्य सेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या आरोग्य सेविका साथीच्या आजरांच्या काळात विभागात फिरुन संशयीत रुग्ण शोधण्याचे महत्वाचे काम करतात. त्याचबरोबर लसिकरणाबाबत नागरीकांना माहिती देणे, लसिकरणासाठी वैद्यकिय कर्मचार्यांना सहकार्य करणे अशी महत्वाचे कामे करतात.
( संकलन - सुमित बागुल )
health workers in mumbai didnt get their salaries how to survive is questions in front of them
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.