मुंबई

"काँग्रेसला हे अजिबात आवडलेलं नाही"; राष्ट्रवादीवर जाहीर नाराजी

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट शब्दात आपली नाराजी बोलून दाखवली

विराज भागवत

मुंबई: राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. अशातच लसीकरणासंदर्भात महाविकास आघाडी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला. राज्यातील १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या संदर्भातील माहिती दिली. त्यासाठी स्वस्त दरात आणि चांगली लस उपलब्ध व्हावी म्हणून जागतिक टेंडर काढण्यात येणार आहे आणि राज्य सरकारच्या तिजोरीतून हा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं. कोरोना लस मोफत देण्याच्या निर्णयावर विचार सुरू असतानाच राष्ट्रवादीने घोषणा केल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी दिसून आली. महाविकास आघाडीतील नेत्याने यावर मत व्यक्त केलं.

"लसीकरणाबाबत आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी, नागरिकांना लस मोफत दिली गेली पाहिजे असा आग्रह धरला आहे. मोफत लस द्यावी अशी मागणी आम्हीदेखील मुख्यमंत्र्यांकडे करतो आहोत. पण मुख्यमंत्री याबद्दल विचार करत असताना केवळ श्रेय घेण्यासाठी जर कोणी काही जाहीर करत असेल, तर ते आम्हाला आवडलेलं नाही", अशा स्पष्ट शब्दात बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांच्याबद्दलची नाराजी व्यक्त केली. "नागरिकांना लस मोफत द्यावी या मुद्द्यावरून श्रेयवादाची लढाई योग्य नाही. हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला पाहिजे. त्यामुळे याबाबत चर्चा सुरू असताना श्रेयासाठी घोषणा करणे योग्य नाही", असंही ते म्हणाले.

"45 वर्षांच्या वरील लोकांना लसीकरण देताना गोंधळ झाला होता, त्यामुळे आता 18 वर्षांवरील नागरिकांना लस देताना धोरण ठरवावं लागेल. आता गर्दी वाढण्याची शक्यता आहे. यात गोंधळ होऊन कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता आहे. या साऱ्याचा विचार करताना मी मुख्य सचिवांबरोबर चर्चा केली. आपण राज्याचं धोरण ठरवलं पाहिजे, असं त्यांना सांगितलं. लस उपलब्ध करून देणं ही केंद्राची जबाबदारी आहे आणि लसीकरण करणं राज्याचे कर्तव्य आहे. त्यामुळे दोन दिवसांत या संबंधीचे धोरण निश्चित केले जाईल", अशी माहितीही त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balasaheb Thorat: निवडणूक आयोगाचा असा गोंधळ कधीच पाहिला नाही: बाळासाहेब थोरात; आयोगाबाबत व्यक्त केली खंत, नेमके काय केले गंभीर आराेप ?

Mumbai Congress: सत्तेत आल्यावर काँग्रेस मुंबईसाठी काय करणार? प्रदूषणमुक्त अन्...; संपूर्ण प्लॅनच सांगितला

रितेश देशमुख मराठी बिग बॉस होस्ट करणार, सलमान खान म्हणाला...'भाऊ तुम्हाला...'

Indian Navy : तंत्रज्ञानामुळे युद्धनीतीत वेगाने बदल, ॲडमिरल त्रिपाठी; एनडीएच्या तुकडीचा दीक्षान्त संचलन सोहळा उत्साहात

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात तेलगू नगरमध्ये काँग्रेस नगरसेवकाच्या बॅनरवर शाही फेकण्याची घटना

SCROLL FOR NEXT