मुंबई

मुंबईत मुसळधार पाऊस, हिंदमाता परिसरात साचलं पाणी

दीनानाथ परब

मुंबई: मुंबईत काल रात्रीपासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाला (heavy rain) सुरुवात झाली आहे. मागच्या आठवड्या अखेरीस शनिवार-रविवारी ऑरेंज आणि रेड अलर्ट देण्यात आला होता. पण तसा पाऊस झालाच नाही. काल रात्रीपासून पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. आज सकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. नेहमीप्रमाणे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. अपेक्षेप्रमाणे हिंदमाता परिसरात पाणी साचले आहे. (Heavy rain in mumbai waterlogging at hindmata)

असाच पाऊस सुरु राहिला तर अन्य भागातही पाणी साचेल. मागच्या आठवड्यात एकाच दिवसात झालेल्या धुवाधार पावसाने पालिकेच्या दाव्यांची पोल-खोल झाली होती. मुंबईत चार तासापेक्षा जास्त वेळ पाणी साचून राहत नाहीय असे मुंबईच्या महापौर म्हणाल्या होत्या. चार तासापेक्षा जास्त वेळ पाणी साचले, तर काम खराब झालेय असे म्हणता येईल, असे महापौरांचे म्हणणे होते. मनसे, भाजपा या विरोधी पक्षांनी त्यावेळी पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा समाचार घेतला होता.

अजून तरी मुंबईत रस्ते, रेल्वे आणि बस वाहतूक सुरळीत सुरु आहे. पाणी साचल्यामुळे सार्वजनिक वाहतुकीला ब्रेक लागलेला नाही. मागच्या आठवड्यात रेल्वे रुळावर पाणी आल्यामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली होती. बसचे मार्ग बदलावे लागले होते. सध्या हिंदमाता परिसरात पाणी साचल्याचे वृत्त आहे.

हिंदमाता भागात पाणी साचू नये, यासाठी एका प्रकल्पावर काम सुरु आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये इथे पाणी साचणार नाही, असा विश्वास चहल यांनी व्यक्त केला.

जुलैपासून हिंदमाता परिसरात पाणी नाही साचणार कारण...

"हिंदमाता भागात पाणी साचू नये, यासाठी आम्ही १४० कोटींचा प्रकल्प होती घेतला. सेंट झेवियर्स ते स्वर्गीय प्रमोद महाजन उद्यान इथे टाक्या बांधल्या. चार महिन्यात १४० कोटींचे काम केले. इथून दीड किमी अंतर आहे. रेल्वे लाईन होती. तिथे भूमिगत पाईपलाइन टाकण्यासाठी एनओसी मिळाली. परंतु केंद्राच्या मालकीच्या टाटा मिल्स खालून पाईपलाइन टाकण्यासाठी परवानगी मिळत नव्हती."

"त्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. मोठया टाक्या बांधल्या पण पाईपलाइन नसेल, तर पाणी वळवू शकत नाही. अखेर ३१ मे रोजी परवानगी मिळाली. दोन जूनपासून पाईपलाईन टाकण्याचं काम सुरु केलं. ते येत्या २५ जूनपर्यंत ते पूर्ण होईल. पुढच्यावेळी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत पंपिंग करुन पाणी भूमिगत टाक्यांमध्ये वळवू ते साचू देणार नाही" असा निर्धार पालिका आयुक्तांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

Latest Marathi News Live Update : अंधेरी पंप परिसरात मोठी आग, दारू दुकान जळून खाक

SCROLL FOR NEXT