मुंबई

Mumbai Rains :  पावसाने उडवली मुंबईची झोप!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - सोमवारी दिवसभर पावसाचा जोर होता; परंतु रात्री त्याने रौद्र रूप धारण केल्याने मुंबईकरांची झोप उडाली. किंग्ज सर्कलपासून मुलुंड ते दहिसरपर्यंतचे अनेक भाग पाण्यात गेले होते. तिन्ही मार्गांवरील लोकलसेवा ठप्प पडल्याने रात्री उशिरा घरी जाणाऱ्यांचे मोठे हाल झाले. राज्य सरकारने मंगळवारी सुट्टी जाहीर केल्याने आणि पावसाचा चांगलाच फटका याआधीही मुंबईने अनुभवला असल्याने आज मुंबईकर लोकल आणि बसच्या वाटेलाच गेले नाहीत. त्यामुळे सकाळपासून मुंबईचे रस्ते रिकामी वाटत होते... रस्त्यावर होते ते फक्त पावसाच्या पाण्याचेच साम्राज्य.

अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यातच खबरदारीचा उपाय म्हणून वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने हालात भर पडली. मुंबई विमानतळावर स्पाईसजेटचे विमान घसरल्याने मुख्य धावपट्टीही बंद पडली होती. संपूर्ण मुंबईबरोबरच ‘मातोश्री’चा परिसरही पाण्याखाली बुडाला होता. मुंबईतील उपनगरात रात्री पावसाने चांगलाच जोर धरला होता. रात्री १० वाजल्याच्या सुमारास जोरदार पाऊस होत असताना समुद्राला भरती असल्याने पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. त्यामुळे निम्मे उपनगर पाण्याखाली गेले होते. मध्यरात्रीपासूनच अनेक घरांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली. खबरदारीचा उपाय म्हणून उपनगराच्या अनेक भागांमधील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. पहाटेपर्यंत घरातील पाणी उपसण्याचे काम सुरू होते. मध्य रेल्वे सोमवारी रात्री ११ च्या सुमारास बंद पडली. त्यानंतर हार्बर आणि पश्‍चिम रेल्वेची लोकलसेवाही ठप्प झाली. त्यामुळे शेकडो प्रवाशांना काळोख्या रात्रीतून रेल्वे मार्गातून पायपीट करावी लागत होती. अनेक जणांनी लोकलमध्येच मुक्काम केला. पोलिस ठाणी आणि रेल्वेस्थानके पाण्याने तुडुंब  भरली होती.

मध्यरात्रीपर्यंत खोळंबा
मुसळधार पावसाने सर्वांचीच दाणादाण उडाली. त्याचा फटका मध्य रेल्वेच्या वाहतुकीला बसला. सोमवारी रात्रीपासून मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याने कर्जत-कसारा मार्गावरील घरी परतणाऱ्या लोकल प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. ठाणे रेल्वेस्थानकातून एकही लोकल पुढे जात नसल्याने लांब जाणाऱ्या प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. काहींनी मिळेल त्या ठिकाणी मुक्काम ठोकला. काहींचा मध्यरात्रीपर्यंत खोळंबा झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT