मुंबई

एक्‍स्प्रेस-वेवरील टोलवसुलीला उच्च न्यायालयात आव्हान 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस-वेवर आणखी 10 वर्षे टोलवसुलीस मनाई करण्याच्या मागणीची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. मागील 10 वर्षांहून अधिक काळ केलेल्या टोलवसुलीतून राज्य सरकार आणि विकासकांना करारातील रकमेहून अधिक महसूल मिळाल्याचा दावा याचिकादाराने केला आहे. 

माहिती अधिकार कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोलवसुलीच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका केली आहे. या याचिकेचा उल्लेख सोमवारी (ता. 16) न्या. सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे करण्यात आला. करारानुसार ऑगस्ट 2004 मध्ये टोलवसुलीची रक्कम सुमारे 3632 कोटी रुपये ठरवण्यात आली होती.

ऑगस्ट 2004 ते ऑगस्ट 2019 पर्यंत ही रक्कम वसूल करावयची होती. 
कॅगच्या अहवालानुसार सुमारे 4266 कोटी रुपयांचा टोल वसूल झाल्याचे मूल्यांकन करण्यात आले आहे. त्याचबरोबर टोल नाके असलेल्या जमिनींच्या व्यावसायिक वापरातूनही उत्पन्न मिळाले आहे. या पार्श्‍वभूमीवर आतापर्यंत वसूल झालेला टोल कराराच्या तुलनेत अधिक असल्याचे याचिकादार वाटेगावकर यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळासह मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस-वे लिमिटेडला याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे. 

राज्य सरकारने आगामी 10 वर्षांसाठी टोलवसुली करण्याबाबतच्या निविदा नोव्हेंबरमध्ये जाहीर केल्या. आतापर्यंतची टोलवसुली पुरेशी असल्यामुळे यापुढे कार्यवाही होऊ नये, अशी मागणी याचिकादाराने केली आहे. या याचिकेवर जानेवारीत पुढील सुनावणी होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT