Holidays may reduce the percentage of voting
Holidays may reduce the percentage of voting 
मुंबई

सुट्ट्यांमुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : शनिवारपासून शाळा-महाविद्यालयांना दिवाळीच्या सुट्ट्या लागत असल्याने शहरातील अनेक कुटुंबांनी गावचा रस्ता धरला आहे. शनिवार आणि रविवारचे बुकिंग फुल झाल्याने मतदानाच्या टक्केवारीवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्‍यता आहे. 

नवी मुंबईतील शाळा-महाविद्यालयांच्या १९ ऑक्‍टोबरपासून दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होत आहेत. १५ दिवस सुट्टी असल्याने लोकांनी आधीच गावी व बाहेरगावी जाण्याचेही बुकिंग केले आहे. ऐन सुट्टीच्या काळात जास्तीचे पैसे देऊन लक्‍झरी व गाड्यांचे बुकिंग करावे लागते. ते टाळण्यासाठी तसेच मे महिन्यात महिना दोन महिने आणि दिवाळीची १५ दिवसांची सुट्टी गृहीत धरूनच सुट्ट्या सुरू होण्यापूर्वीच एक दोन दिवस आधी बुकिंग होत असल्याचे, ट्रॅव्हल्स मालकांचे म्हणणे आहे. मतदारराजाच मतदानादिवशी (२१ ऑक्‍टोबर) शहरातून काढता पाय घेत असल्याने याचा मतदानावर परिणाम होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. याबाबत साई टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सचे रवी पाटील यांनी सांगितले की, सध्या कोल्हापूर, सांगली, धुळे, जळगावला जाणाऱ्या गाड्यांचे शनिवार आणि रविवारसाठी ३० ते ३५ टक्के बुकिंग झाले आहे. अजूनही बुकिंग सुरू आहे.  

आमच्याकडे शनिवार, रविवारसाठीचे जळगाव, भुसावळ, सोलापूर, औरंगाबाद, नाशिकची अगोदरच ५० टक्के बुकिंग झाली आहे. आता सुट्ट्या सुरू होत असल्याने अजूनही बुकिंग वाढतच आहे. 
- सुरेंद्र मिरजकर, बालाजी ट्रॅव्हल्स.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT