नवी मंबईतील ‘या’ परिसरात नागरिक धास्तावले! पाहा नेमकं काय झालंय.. 
मुंबई

नवी मंबईतील ‘या’ परिसरात नागरिक धास्तावले! पाहा नेमकं काय झालंय..

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : कोपरखैरणे भागात घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, चोरट्यांनी शुक्रवारी (ता. 20) भरदिवसा कोपरखैरणे सेक्‍टर 15 मधील आणखी दोन घरांत चोरी केल्याचे समोर आले आहे. या वेळी या दोघा चोरट्यांनी तीन लाख नऊ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. गत आठवड्यात चोरट्यांनी भरदिवसा चार घरफोड्या करून लाखोंचा ऐवज चोरून नेला होता. त्यापाठोपाठ आता चोरट्यांनी आणखी दोन घरे फोडल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

कोपरखैरणे सेक्‍टर 15 मध्ये राहणारे बाळू गोविंदा शिंदे यांचे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घरावर डल्ला मारला. यात चोरट्यांनी रोख रक्कम आणि वेगवेगळ्या प्रकारचे दागिने असा सुमारे तीन लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी शिंदे यांच्या शेजारी राहणारे महेश पवार यांच्या स्वयंपाकगृहाच्या खिडकीवाटे प्रवेश करून त्यांच्या घरातील मोबाईल फोन चोरून नेला. महेश यांच्या पत्नी सायंकाळी 5.30 वाजता भाजी आणण्यासाठी गेल्या असताना चोरट्यांनी ही चोरी केली. त्यांनतर 6.15 वाजण्याच्या सुमारास त्या घरी परतल्यानंतर घरात तसेच शेजारी राहणाऱ्या बाळू शिंदे यांच्या घरातदेखील चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी कोपरखैरणे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

गेल्या आठवड्यात चार घरफोड्या 
मागील आठवड्यात चोरट्यांनी कोपरखैरणेत एका दिवसात चार वेगवेगळ्या ठिकाणी घरफोड्या करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला होता. पोलिसांकडून या घरफोड्यांचा तपास सुरू असतानाच चोरट्यांनी आणखी दोन घरफोड्या केल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. तसेच दिवसाढवळ्या होणाऱ्या घरफोड्यांमुळे रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT