Dasara Melava Cm Eknath Shinde delhi tour Amit Shah pm narendra modi  esakal
मुंबई

Amit Shah in Mumbai: अमित शाहांमुळेच राज्यात मागील वर्षी क्रांती झाली; एकनाथ शिंदेंनी दिली कबुली

कार्तिक पुजारी

Amit Shah in Mumbai

मुंबई- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी माजी आरएसएस प्रचारक लक्ष्मणराव इनामदार यांच्या आठवणींना उजाळा दिला. लक्ष्मणराव पारसमणी होते असा गौरवोद्वार त्यांनी काढला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावेळी भाषण केलं. यावेळी त्यांनी केलेल्या भाषणाची चर्चा रंगू लागली आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, 'अमित शहा यांना एक कणखर नेता म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. पण, अमित शहा किती कणखर आहेत याचा अनुभव मला जास्त आहे. जी काही राज्यात वर्षभरात क्रांती झाली त्यात..त्यामुळे म्हणतो मला त्यांचा जास्त अनुभव आहे.' या भाषणावेळी एकनाथ शिंदे आणि अमित शाह ऐकमेकांकडे पाहून हसल्याचं पाहायला मिळालं.

एकनाथ शिंदे यांच्या या संभाषणामुळे महाराष्ट्रात जी उलथापालथ झाली, यामागे अमित शहा हे खरे सूत्रधार असल्याचं बोललं जात आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, त्यावेळी रात्री अपरात्री बैठका व्हायच्या. अमित शाह यांनी एकदा शब्द दिला की तो दिलाच. इतिहास वाचायचा नसतो इतिहास घडवायचा असतो असं अमित भाईंचं म्हणणं असतं.'

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून फुटून वेगळी वाट धरली होती. त्यांच्यासोबत ४० आमदार आले होते. महाराष्ट्राच्या राजकारणातील ही मोठी घडामोड होती. शिंदेंच्या आमदारांना गुवाहाटी येथे हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. शिवसेनेच्या बंडामागे अमित शहा यांचा हात होता, अशी शेट कबुली एकनाथ शिंदे यांनी दिल्याचं बोललं जातंय.

लक्ष्मणराव इनामदार हे पंतप्रधान मोदींचे गुरू होते तर अमित शाह यांचे देखिल ते मार्गदर्शक होते. अमित शहा म्हणजे मोदींची सावली आहेत. लक्ष्मणराव इनामदार हे महाराष्ट्र आणि गुजरात मधील एक दुवा होते, असं एकनाथ शिंदे म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: ठाण्यात मुसळधार पावसामुळे झाडे कोसळली

SCROLL FOR NEXT