home minister amit shah mumbai Visit amide ganeshotsav 2022 Cm eknath shinde devendra fadanvis  
मुंबई

केंद्रीय गृहमंत्री शाह मुंबईत दाखल, उद्या घेणार महत्वाची बैठक

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल झाले आहेत. उद्या शाह हे लालबागचा राजाचे दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर ते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर उद्या सकाळी साडे अकरा वाजता भाजपच्या कोअर कमिटीची बैठक घेणार आहेत, तसेच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकांसंदर्भात देखील उद्याच्या बैठकीत रणनीती ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या सद्यस्थितीवर देखील चर्चा होणार आहे.

अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा हा सोमवारी सकाळी नऊपासून त्यांचा सुरू होणार आहे. यामध्ये ते सुरूवातीली लालबागचा राजा, सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांच्या गणपतीचेही दर्शन घेणार आहेत. दरम्यान आज विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या इतर अनेक नेत्यांनी मुंबई विमानतळावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे स्वागत केले,

दौऱ्यानिमित्त वाहतूकीत बदल

या दौऱ्यानिमित्ताने 4 आणि 5 सप्टेंबर रोजी मध्य मुंबई, दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरातील काही भागात वाहतुकीचे नियम लागू होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्यामुळे 5 सप्टेंबरला सोमवारी सकाळी 9 ते दुपारी 12.30 या वेळेत लालबाग, परळ, लोटस जंक्शन, महालक्ष्मी रेसकोर्स, सात रस्ता, चिंचपोकळी जंक्शन, मलबार हिल, केम्प्स कॉर्नर, बाबुलनाथ, हाजी अली, वरळी डेअरी वरळी सी लिंक आणि लीलावती जंक्शन आदी भागात वाहनांच्या वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

मलबार हिल, गिरगाव चौपाटी, मरीन ड्राइव्ह, रिगल जंक्शन आणि कुलाबा परिसरात सोमवारी दुपारी 2 ते 3 या वेळेत वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. मरोळ आणि पवई भागात सोमवारी दुपारी 3 ते संध्याकाळी 6 या वेळेत निर्बंध असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT