cancer 
मुंबई

#HopeOfLife : कर्करोगावरील शस्त्रक्रियेचे प्रकार

डॉ.डोनाल्ड बाबू

मुंबई : कर्करोगाचा सामना करणाऱ्या रुग्णांना अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया उपयुक्त ठरत असतात. त्यापैकी काही शस्त्रक्रियांचा वापर हा अन्य प्रकारच्या उपचारांसाठीदेखील केला जातो. शस्त्रक्रियांच्या अशा विविध प्रकारांमध्ये रोगनिवारक (क्‍युरेटिव्ह) शस्त्रक्रियेचा  समावेश आहे.

क्‍युरेटिव्ह शस्त्रक्रिया 
क्‍युरेटिव्ह शस्त्रक्रिया करून कर्करोगाची गाठ (ट्युमर) किंवा त्याची होत असलेली वाढ काढली जाते. मानवी शरीराच्या विशिष्ट भागात कर्करोगाची गाठ आढळून आल्यास डॉक्‍टरांकडून क्‍युरेटिव्ह शस्त्रक्रिया केली जाते. या प्रकाराच्या उपचाराला अनेकदा प्राथमिक उपचार पद्धतीही मानले जाते. कर्करोगावरील रेडिएशनसारख्या अन्य प्रकारच्या उपचार पद्धतीचा वापर हा अनेकदा शस्त्रक्रियेच्या अगोदर किंवा शस्त्रक्रियेनंतर केला जाऊ शकतो.

प्रतिबंधात्मक शस्त्रक्रिया
कर्करोग पेशींचा समावेश नसलेल्या, मात्र ज्याचे घातक कर्करोगाच्या गाठीमध्ये रूपांतर होण्याची शक्‍यता आहे, अशा उतींना काढून टाकण्यासाठी प्रतिबंधात्मक शस्त्रक्रियेचा वापर केला जातो. जसे कोलनमध्ये असलेले पॉलिप्स हे कर्करोगयुक्त उती असण्याची शक्‍यता असते. त्यामुळे ते काढण्यासाठी प्रतिबंधात्मक शस्त्रक्रिया आवश्‍यक ठरते.

निदानात्मक शस्त्रक्रिया
पेशींच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी निदानात्मक शस्त्रक्रियेची मदत मिळते. पॅथोलॉजिस्ट्‌सद्वारे प्रयोगशाळेत उतीचा नमुना चाचणी आणि मूल्यमापनासाठी काढण्यासाठी ही शस्त्रक्रिया करतात. उतींचे हे नमुने निदान पक्के करण्यास, कर्करोगाचा प्रकार ओळखण्यासाठी किंवा कर्करोगाचा टप्पा निर्धारित करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

पुनर्संचयित (रिस्टोरेटिव्ह) शस्त्रक्रिया
पुनर्संचयित शस्त्रक्रिया ही व्यक्तीच्या शरीरातील अवयवाच्या कार्यात बदल करण्यासाठी किंवा पुनर्संचयित करण्यासाठीच्या क्‍युरेटिव्ह किंवा अन्य शस्त्रक्रियाचा मागोवा घेण्यासाठी करतात. उदाहरणार्थ, स्तनाचा कर्करोग असलेल्या महिलांना त्यांच्या स्तनांचा आकार पूर्ववत होण्यासाठी ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्‍शन सर्जरीची आवश्‍यकता असते. तोंडाचा कर्करोगासाठीची क्‍युरेटिव्ह शस्त्रक्रिया ही तोंडाचा आकार आणि रूपामध्ये बदल घडवू शकते. या सर्व परिणामांसाठी पुनर्संचयित शस्त्रक्रिया केली जाऊ शकते. यामध्ये ओटीपोट आणि वक्षस्थळाच्या कर्करोगासाठी वापरल्या जाणाऱ्या रोबोटिक आणि लेझर शस्त्रक्रियेचा समावेश आहे. ही व्रणरहित शस्त्रक्रिया असून सुरुवातीलाच ती वापरली जाऊ शकते.

सहाय्यक (सपोर्टिव्ह) शस्त्रक्रिया
सहाय्यक शस्त्रक्रियेमुळे कर्करोग पूर्णपणे बरा होत नाही. त्यामुळे ती वेदनानिवारक शस्त्रक्रियेशी समकक्ष आहे. याउलट ही शस्त्रक्रिया कर्करोगावरील अन्य उपचार पद्धतीला अधिक प्रभावी करण्यास मदत करते. केमोथेरपीसाठी मदत म्हणून कॅथेटर टाकणे हे सहायक शस्त्रक्रियेचे उदाहरण आहे.

स्टेजिंग शस्त्रक्रिया
स्टेजिंग शस्त्रक्रिया कर्करोगाचे प्रमाण किंवा शरीरातील रोगाचे प्रमाण शोधण्यासाठी करतात. लॅप्रोस्कोपी (लेन्स किंवा कॅमेरा असलेली ट्युब शरीरांतर्गत तपासणीसाठी आणि उतींचे नमुने बाहेर काढण्यासाठी एका लहान चिरातून आत टाकली जाते) हे या शस्त्रक्रियेचे एक उदाहरण आहे.

डिबल्किंग शस्त्रक्रिया
डिबल्किंग शस्त्रक्रियेद्वारे कर्करोगाच्या गाठीमधील काही भाग बाहेर काढतात. गाठ काढल्यामुळे जर एखाद्या अवयवाला किंवा शरीराला हानी पोहचण्याची शक्‍यता असेल, तर अशा अवस्थेत ही शस्त्रक्रिया करतात. केमोथेरपी आणि रेडिएशनसारख्या कर्करोगावरील उपचार पद्धतींचा वापर डिबल्किंग शस्त्रक्रियेनंतर केला जाऊ शकतो.

वेदनानिवारक (पॅलिएटिव्ह) शस्त्रक्रिया
कर्करोगाच्या प्रगत अवस्थेतील कर्करोगावर उपचार करण्यासाठी वेदनानिवारक शस्त्रक्रिया केली जाते. ही शस्त्रक्रिया कर्करोग पूर्णपणे बरा करत नाही; मात्र अस्वस्थता दूर करण्यासाठी किंवा कर्करोग किंवा कर्करोगावरील उपचारांमुळे निर्माण झालेल्या समस्या दूर करण्यासाठी करतात.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 Winner: स्मृती मानधानाच्या RCB ने इतिहास रचला, दुसऱ्यांदा जिंकले जेतेपद; दिल्ली सलग चौथ्यांदा फायनलमध्ये पराभूत

Aishwarya Special Wishes to Abhishek: ऐश्वर्याने अभिषेकला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा; लहानपणीचा फोटो शेअर केला अन् म्हणाली...

WhatsApp Scam : व्हॉट्सॲप ‘गुंतवणूक’ सापळा, तिघांना सव्वा कोटींचा गंडा; व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे शेअर बाजारात गुंतवणूक पडली महागात

झेडपीसाठी उद्या मतदान! सोलापूर जिल्ह्यात 8 वर्षांत वाढले 3.27 लाख मतदार; लाडक्या बहिणींचा टक्का वाढला; 2017 मध्ये झाले होते 66.96 टक्के मतदान, वाचा...

Meghalaya Coal Mine Blast : मेघालय हादरलं! अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट, मृतांचा आकडा १८ वर; अनेक अडकल्याची भीती

SCROLL FOR NEXT