file photo 
मुंबई

#HopeOfLife : राज्याला हवीत "टाटा'सारखी तीन रुग्णालये! 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : टाटा कर्करोग रुग्णालयाच्या धर्तीवर राज्यात किमान तीन रुग्णालयांची गरज आहे. भविष्याची गरज ओळखून चार कोटी लोकसंख्येमागे 300 खाटांचे एक अशी 20 रुग्णालये आवश्‍यक आहेत, अशी शिफारस कॉंग्रेसचे खासदार जयराम रमेश यांच्या अध्यक्षतेखालील राज्यसभेच्या स्थायी समितीने केली आहे. या समितीने देशातील कर्करोगाच्या उपचारांबाबतचा अहवाल सादर केला आहे.
 
महाराष्ट्राची सध्याची लोकसंख्या 13 कोटींहून अधिक आहे. 2018 मध्ये राज्यात नव्याने एक लाख 44 हजार 32 कर्करोग रुग्णांची नोंद झाली आहे. संसदीय समितीने सुचवलेल्या शिफारशीनुसार 30 ते 40 हजार रुग्णांसाठी एक रुग्णालय आवश्‍यक आहे.

हेही वाचा ः #HopeOfLife : "कार टी सेल्स' ठरणार कर्करोग्रस्तांना संजीवनी!

समितीने कर्करोग रुग्णालयाचे "हब' आणि "स्पोक्‍स' अशा दोन मॉडेलची शिफारस केली आहे. यात हब 50 एकरवरील 300 खाटांचे रुग्णालय असेल. ज्यात महत्त्वाचे उपचार केले जातील. त्याखालोखाल 100 खाटांचे स्पोक्‍स रुग्णालय 50 लाख ते 1 कोटी लोकसंख्येमागे एक असेल. वर्षाला सहा ते आठ हजार रुग्णांवर यामुळे उपचार करता येतील, असेही समितीने अहवालात नमूद केले आहे. 

हेही वाचा ः #HopeOfLife : वैद्यकीय मदत मिळेल; खचून जावू नका!

ही दोन्ही प्रकारची रुग्णालये विमानतळे, रेल्वे स्थानक आणि रस्तेमार्गाला जोडणाऱ्या जागेत असावीत. तसेच, वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयाशीही जोडलेले असावे, अशी शिफारसही करण्यात समितीने केली आहे. 

अशी असावीत रुग्णालये.... 
हब 
300 खाटा 
50 एकर क्षेत्रफळ 
650 कोटी बांधणीचा खर्च 
110 ते 120 कोटी वार्षिक खर्च 

स्पोक्‍स 
100 खाटा 
10 एकर क्षेत्रफळ 
220 कोटी बांधणीचा खर्च 
35 ते 40 कोटी वार्षिक खर्च
 
 
कुठे कोणते उपचार? 
स्पोक्‍स सेंटर आणि हब एकमेकांच्या सहकार्याने काम करतील. स्पोक्‍स रुग्णालयांत रेडिएशन, लहान-मोठ्या शस्त्रक्रिया तसेच केमोथेरपीही होतील, तर हब सेंटरमध्ये महत्त्वाच्या आणि गुंतागुतीच्या शस्त्रक्रिया, उच्च दर्जाचे रेडिएशन, बोन मॅरो आदी पद्धतीचे उपचार होतील. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra SSC Exam 2027 : दहावीच्या विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा! बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

IND vs AFG 3rd T20I: इथे-तिथे-सगळीकडे राशिद खान... भन्नाट रन आऊट अन् दोन अविश्वसनीय झेलने फिरवली मॅच; Video Viral

US OPT Fee : अमेरिकेत शिक्षणानंतर नोकरी करण्याचा मार्ग महागणार? द्यावे लागणार एक कोटींचे OPT शुल्क, भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम

Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टीम इंडियाचा धावांचा एव्हरेस्ट! संजू सॅमसनची सलग फिफ्टी...

SCROLL FOR NEXT