मुंबई

शिक्षकाच्या सांगण्यावरून त्यांनी दिलं कुत्र्यांच्या पिल्लांना विष, २२ पिल्लांना फेकलं झाडीत

सकाळवृत्तसेवा

नालासोपारा - विरार येथील म्हाडा कॉलनीमध्ये 8 कुत्र्यांच्या पिल्लांना विष देऊन मारल्याचे; तसेच 22 पिल्लांना झाडीत फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना "ऍनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया'चे पालघर जिल्हा ऑफिसर मितेश जैन यांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार तीन जणांवर अर्नाळा पोलिस ठाण्यात बुधवारी (ता. 29) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अर्नाळा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

शिक्षकाच्या सांगण्यावरून कृत्य? 

मितेश जैन आणि डॉक्‍टरने तेथील भोला शास्त्री, पप्पू पासवान, रवी वर्मा यांच्याकडे विचारपूस केली असता म्हाडा कॉलनी येथील एका शिक्षकाच्या सांगण्यावरून हे कृत्य केले असल्याचे समोर आले. त्यानंतर या तिघांवर अर्नाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

या प्रकरणी भोला शास्त्री (सफाई कामगार), पप्पू पासवान (वॉचमन), रवी वर्मा (वॉचमन) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. हे सर्व जण विरार पश्‍चिम म्हाडा बिल्डिंग नंबर 13 मध्ये कार्यरत आहेत. बुधवारी (ता.29) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास म्हाडा कॉलनी परिसरात आठ कुत्र्यांच्या पिल्लांचा मृत्यू; तर 22 पेक्षा जास्त कुत्र्यांची ल्ल्लिे बेपत्ता असल्याची माहिती कुणाल घाटे यांनी मितेश जैन यांना दिली होती.

जैन यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली असता 8 कुत्र्याची पिल्ले मृतावस्थेत आढळून आली; तर 22 पिल्ले बाजूच्या झाडाझुडपांमध्ये फेकून दिल्याचे त्यांना समजले. 22 पैकी तीन जखमी पिल्लाना जैन यांनी तत्काळ त्यांच्या विरार येथील करुणा ट्रस्टच्या डॉक्‍टरला बोलावून त्यांच्यावर उपचार करून सुरक्षित स्थळी पोहोचविले. 

horrible poisoning to dogs in nalasopara further investigation is in process

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT