... तासनतास प्रवास करून त्यांना यावं लागतंय कामावर! 
मुंबई

...तासनतास प्रवास करून त्यांना यावं लागतंय कामावर!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राहण्याचे ठिकाण विरार, नालासोपारा, वांगणी किंवा कसारा आणि कामाचे ठिकाण मुंबईतील कस्तुरबा, केईएम किंवा शताब्दी ही रुग्णालये. त्यामुळे मुंबई महापालिकेचे अनेक कर्मचारी दररोज 5 ते 6 तासांचा प्रवास करून कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी येतात. महापालिकेने डॉक्‍टर व परिचारिकांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे; मग आमच्यावरच अन्याय का, असा सवाल हे कर्मचारी करत आहेत. 

मुंबई महापालिकेने कस्तुरबा, शताब्दी, केईएम, नायर, सायन व इतर रुग्णालयांत विलगीकरण केंद्रे सुरू केली आहेत. तेथील डॉक्‍टर आणि परिचारिकांसाठी "सेफ्टी किट' व राहण्याची व्यवस्था केली आहे. याच रुग्णालयांतील चतुर्थ श्रेणी कामगारांना मात्र "सेफ्टी किट' देण्यात आलेले नाही. या रुग्णालयांतील अनेक कामगार-कर्मचारी वसई, विरार, नालासोपारा, शहापूर आदी ठिकाणी राहतात. महापालिकेने कर्मचाऱ्यांसाठी ठराविक ठिकाणांहून बसची व्यवस्था केली असली, तरी त्यांना घरातून तेथे पोहोचण्यासाठी धावपळ करावी लागते. मुंबईत आल्यानंतर रुग्णालयांत जाण्यासाठी या कर्मचाऱ्यांना दुसरी बस पकडावी लागते. त्यामुळे त्यांना दररोज पाच ते सहा तासांचा प्रवास करावा लागतो. काम करून थकलेल्या कर्मचाऱ्यांना नाईलाजाने घरी जावे लागते. आमच्यामुळे कुटुंबीयांनाही संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाल्याचे ते सांगतात. त्यामुळे डॉक्‍टर आणि परिचारिकांप्रमाणे आमचीही रुग्णालयांजवळ राहण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी हे कर्मचारी करत आहेत. 

कर्मचाऱ्यांना आलटून-पालटून कामावर बोलावले जाते. कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. काही कर्मचारी स्वतःहून व्यवस्था केलेल्या ठिकाणी न राहता आपल्या घरी जाणे पसंत करतात. 
- डॉ. तात्याराव लहाने, उपसंचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन महासंचालनालय. 

अनेक कर्मचारी मुंबई महापालिका क्षेत्राबाहेर राहतात. त्यामुळे प्रवासात त्यांचे अनेक तास वाया जातात. त्याचप्रमाणे त्यांच्या आरोग्यावरही अनिष्ट परिणाम होतो. म्हणून प्रशासनाने त्यांची रुग्णालयाजवळच राहण्याची व्यवस्था करावी. 
- रमेश जाधव, अध्यक्ष, रिपब्लिकन कामगार सेना.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: सोशल मीडियावरील TRP ला तुमचे यश समजण्याची चूक करू नका; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा कुणाला सल्ला?

Radhanagari Dam Water Level : गगनबावड्यासह 12 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी; राधानगरी धरणात 85 टक्के पाणीसाठा, कोल्हापूर जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली

Latest Marathi Update : बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी जंतर-मंतरवर दाखल

PM Narendra Modi On Paper Leak : पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! पेपरफुटीच्या प्रकरणांची फास्ट ट्रॅक कोर्टात होणार सुनावणी

Ujani Dam: उजनी धरणातील आवक १२,७९७ क्युसेकवर; उपयुक्त पाणीसाठा ५४ टक्के, धरणातून ५,५७० क्युसेक विसर्ग कायम

SCROLL FOR NEXT