मुंबई

हॉटस्पॉट कांदिवलीला किंचीत दिलासा, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 50 पार

समीर सुर्वे

मुंबई: ऑगस्ट महिन्या पासून कोविडचा हॉटस्पॉट असलेल्या बोरीवली आर मध्य प्रभागातून दिलासादायक बातमी आहे. या प्रभागातील रुग्ण वाढीचा दर पुन्हा 50 दिवसाच्या वर गेला आहे. 9 ऑक्टोबरला या प्रभागात कोविडचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 53 दिवसांवर आला आहे.

ऑगस्ट अखेर नंतर पहिल्यांदाच मुंबईतील सर्वच विभागातील कोविड रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 50 दिवसांवर आला आहे.

19 ऑगस्टला आर मध्य  प्रभागातील कोविड रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 57 दिवसांचा होता. तेव्हा याा प्रभागात 6 हजार 894 रुग्ण होते. त्यावेळी मुंबईतील सर्व  प्रभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 57 दिवसांपेक्षा जास्त होता. मात्र,तीनच दिवसात 22 ऑगस्टला आर मध्य प्रभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 46 दिवसांवर आला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात क्वचितच रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 50 दिवसांपेक्षा कमीच होता.

महापालिकेच्या साथ रोग नियंत्रण विभागामार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या आकडेवारी नुसार आर मध्य प्रभागातील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 53 दिवसांवर आला आहे. तर संपूर्ण मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालवधी 68 दिवसांचा आहे.लालबाग परळ एफ दक्षिण प्रभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 100 दिवसांवर आहे. त्या खालोखाल सॅन्डहस्टरोड बी प्रभागात 99 दिवसांचा कालवधी आहे.

बोरीवली आर मध्य प्रभागातील कोविडची परिस्थिती 

  • आता पर्यंत आढळलेले रुग्ण - 14932
  • उपचार सुरु असलेले रुग्ण - 2740
  • कोविडवर मात केलेले रुग्ण - 11791
  • मृत्यू - 401
  • मृत्यू दर 2.71 

--------------------------

(संपादनः पूजा विचारे) 

Hotspot Kandivali slightly relieved patient doubling period crossed 50

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT