मुंबई

हवाई दलाच्या तळाजवळ इमारतींना परवानगी कशी? भाजपचा ठाणे पालिकेला सवाल

राजेश मोरे

ठाणे : कोरोनाचे संकट असताना ठाण्यातील कोलशेत येथील हवाई दलाच्या तळापासून 100 मीटरपर्यंत बांधकामांना बंदीचा महापालिकेचा आदेश संभ्रम निर्माण करणारा आहे, असे मत भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर इमारतींच्या बांधकामांना परवानगीसाठी पालिकेवर बड्या व्यक्तीचा दबाव आहे का? असा सवालही पवार यांनी पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना केला आहे.

कोलशेत हवाई दलाच्या तळाजवळ यापूर्वी बांधकामांना परवानगी दिली जात नव्हती. मात्र, काही वर्षांपूर्वी अचानक हवाई दलातील अधिकाऱ्यांच्या एनओसीद्वारे (ना हरकत प्रमाणपत्र) महापालिकेच्या शहर विकास विभागाची परवानगी मिळवून काही विकासकांनी या परिसरात उत्तुंग इमारती उभारल्या. सध्या या इमारतींमध्ये रहिवाशीही वास्तव्याला आले आहेत. या पार्श्वभूमीवर नव्याने काढलेल्या आदेशामुळे संभ्रम निर्माण झाल्याचे पवार यांचे म्हणणे आहे. 

संरक्षण मंत्रालयाकडून हवाई दलाच्या तळांविषयीची नियमावली निश्चित केली जाते. कोलशेत येथील बिल्डरांच्या अनेक इमारतींना हवाई दलाने दिलेली एनओसी अधिकृत आहे का? शहर विकास विभागाने संबंधित एनओसीची हवाई दलाच्या अधिकाऱ्यांकडून पडताळणी केली होती का, संबंधित एनओसी मिळवणारे विकासक व प्रमाणपत्र देणारे अधिकारी आदींची चौकशी करण्याची गरज असल्याची मागणी नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे.

पवार यांनी उपस्थित केलेले प्रश्न
एकीकडे उत्तुंग इमारतींना एनओसी देणारे हवाई दलाचे अधिकारी कोलशेत येथील भूमिपूत्रांच्या एकमजली घरांच्या दुरुस्तीलाही मज्जाव करीत आहेत, ही बाब आश्चर्यकारक आहे, याकडे नगरसेवक नारायण पवार यांनी लक्ष वेधले आहे.हवाई दलाच्या तळाजवळ बड्या विकासकांच्या संकुलाला परवानगी देण्यासाठी महापालिका प्रशासनावर कोणी बडी व्यक्ती दबाव आणत आहे का, या दबावामुळे नव्याने आदेश काढून पालिका अधिकारी पळवाट शोधत आहेत का, नव्या आदेशापूर्वी झालेल्या इमारतींबाबत प्रशासनाची भूमिका काय, तळाजवळच्या इमारतींना मंजुरी देणाऱ्या शहर विकास विभागातील तत्कालीन अधिकारी व तत्कालीन महापालिका आयुक्तांची नावे जाहीर करणार का, असे प्रश्न पवार यांनी केले आहेत. 

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder : केतनचा मोबाईल कुठे होता? हत्येत तिसरी व्यक्ती? राजस्थान कनेक्शन काय?; केतन अग्रवाल प्रकरणात ३ मोठे खुलासे

Nagpur Crime : रक्षकच निघाले भक्षक! वाघाच्या कातडीसह २ पोलिसांना अटक, वन्य तस्करी टोळीचे होते मध्यस्थ; खवल्या मांजराचे खवले जप्त

IND vs ENG, T20I: 'तू काय करतोय यार ईशान...', अभिषेक शर्मा थर्ड अंपायर निर्णय देत असताना का वैतागला? Video Viral

25 वर्षांनंतर पुन्हा गाजणार 'लगान'; आमिर खानसाठी परदेशात होणार खास सन्मान

Latest Marathi News Live Update : चर्चगेट रेल्वे परिसरात झाड कोसळून तीन वाहनांचे नुकसान; पावसाची संततधार कायम

SCROLL FOR NEXT