मुंबई

आपल्या पाल्यांना शाळेत पाठवायचं कसं? पालक आणि शिक्षक संभ्रमात

सकाळ वृत्तसेवा


मुंबई ः बहुसंख्य पालक आपल्या मुला - मुलींना शाळेत पाठवण्याबद्दल साशंक आहेत. त्याचवेळी प्री स्कूल तसेच प्राथमिक शाळांबाबत अभ्यास करणाऱ्या संघटनांनी शाळा सुरु करण्याबाबत उपाय सूचवलेले आहेत. मेचा उत्तरार्ध सुरु झाल्यामुळे अनेकांना शाळांबाबत वेध लागले आहेत. या परिस्थितीत शिक्षणावर प्रतिकुल परिणाम होऊ नये यासाठी उपाय सूचवले आहेत. 

अर्ली चाईल्डहूड असोसिएशन तसेच असोसिएशन फॉर प्रायमरी एज्यूकेशन अँड रिसर्चने संयुक्तपणे 54 पानी अहवाल तयार केला आहे. त्यांनी शाळेतील शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांनी कोणती खबरदारी घ्यावी हे उपाय सूचवले आहेत. सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे सर्व शाळांचे वर्ग एकाच दिवशी सुरु करण्याऐवजी वेगवेगळ्या दिवशी सुरु करावेत अशी सूचना केली आहे. त्यात वरच्या इयत्तामधील मुलांचे वर्ग सुरुवातीस सुरु करावेत आणि खालच्या इयत्तातील तसेच लहान मुलांचे वर्ग उशिरा सुरु करावेत असे सूचवले आहे. त्याचबरोबर कोरोनाचे आक्रमण लक्षात घेऊन वर्षातील सुटीमध्ये बदल करावा त्याचबरोबर अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर यावर्षी तरी भर असू नये असे सूचवले आहे. 

अहवाल तयार करताना विद्यार्थी स्कूल बसने येतात याकडेही आवर्जून लक्ष देण्यात आहे. बसमध्ये प्रवेश करताना प्रत्येक विद्यार्थ्याचे थर्मल चेकींग करावे. कोणताही आजार असलेल्यांना अन्य विद्यार्थ्यांपासून वेगळे ठेवण्यात यावे. तसेच शाळात भोजनाची सोय असल्यास ते कॉमन डायनिंग एरियात न देता, वर्गातच देण्याबाबत विचार करावा. प्रीस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना कोणतीही पुस्तके देऊ नये, त्याचवेळी मुलांची खेळणी सातत्याने निर्जंतुक करण्याचीही सूचना करण्यात आली आहे. 

शिक्षक तसेच शाळातील अन्य कर्मचाऱ्यांना कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठीचे उपाय समजून घेण्यास सांगितले आहे. त्यांनी एकमेकांपासून सुरक्षित अंतर, स्वच्छता तसेच निर्जंतुकीकरणीबाबत मार्गदर्शन करावे. पालकांनीही आपल्या मुला-मुलींवर अभ्यासाचे दडपण आणू नये. त्याचबरोबर पालकांनी सातत्याने शाळांच्या संपर्कात रहावे अशी सूचनाही करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकली; मुंबईसाठी करो या मरो सामना

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT