मुंबई

लोकहो पावसाळा आलाय, जाणून घ्या कुठल्या पाण्यात किती वेळ राहतो कोरोना विषाणू...

सकाळवृत्तसेवा

मुंबई: गेल्या ३ महिन्यांपासून कोरोनानं देशभरात थैमान घातलं आहे. बघता बघता संपूर्ण देशभरात कोरोनाचे २ लाखांच्या जवळपास रुग्ण आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सरकारकडून काही सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच भाज्या, फळं या गोष्टी आणल्यावर त्या धुवून घेऊन मगच त्यांचा वापर करायला हवा असं सांगण्यात आलंय. मात्र आता नळाच्या पाण्यातही कोरोना जिवंत राहू शकतो अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

मुबंईत पावसाळा सुरु होतोय. त्यामुळे पावसाळ्यात कोरोनाचा अधिक धोका निर्माण होईल आणि कोरोनाग्रस्तांची संख्या बळावेल अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. पावसाळा सुरु होताच साथीचे रोग पसरायला सुरुवात होते. तसंच ठिकठिकाणी पाणी तुंबतं. या सांडपाण्यात किंवा तुंबलेल्या पाण्यातही कोरोना अधिक काळ जिवंत राहतो अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.  

पाण्यात किती दिवस जिवंत राहू शकतो कोरोना?

क्लोरिनविरहित नळाच्या पाण्यात कोरोना व्हायरस तब्बल २ दिवस जिवंत राहू शकतो. तसंच तुंबलेल्या घाण पाण्यात हा व्हायरस  20 डिग्री तापमानात जगू शकतो. तर सांडपाण्यात हा व्हायरस तब्बल आठवडाभर राहू शकतो. तसंच हवामान बदलामुळे हे विषाणू हवेतही बऱ्याच काळ टिकून राहतात अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे.

मुंबईला सर्वाधिक धोका:

मुंबईत पावसाचा जोर नेहमीच अधिक असतो. त्यामुळे वस्त्यांमध्ये आणि रस्त्यांवर पाणी जमा होतं. या पाण्यात कोरोनाचे विषाणू तसंच मलेरिया, डेंग्यू या पसरवणारे डासही राहू शकतात. त्यामुळे पावसाळ्यात मुंबईत कोरोनाचा दुसरा टप्पा सुरु होऊ शकतो अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे. 

त्यामुळे या संकटापासून बचाव करण्यासाठी  आरोग्य विभागाला मोठ्या प्रमाणावर डॉक्टरांच्या  आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तुकड्या तयार करणं आवश्यक आहे असं मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आलंय.

for how long corona stays in water read what WHO is saying must read

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat Train Food : ‘वंदे भारत रेल्वे’त प्रवाशांना आता स्थानिक पदार्थ दिले जाणार ; रेल्वेमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Messi and Revanth Reddy Football Video : लिओनेल मेस्सीने हैदराबादेत मुख्यमंत्री रेवंत रेड्डींसोबत खेळला फुटबॉल; हजारो चाहत्यांचा उत्साह शिगेला!

PMC Retired Employees : निवृत्तीनंतर दिलासा; २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा मोफत वैद्यकीय उपचार!

Pune Health : कर्करोग निदानासाठी पुणेकरांना मोठा दिलासा; महापालिकेचे पेट स्कॅन सेंटर सुरू; खासगी रुग्णालयांपेक्षा निम्म्या खर्चात!

Soybean MSP : आधारभूत किमत खरेदीत शेतकऱ्यांवर अन्याय नको; आमदार डॉ. संजय कुटे यांनी अधिवेशनात मांडली ठाम भूमिका!

SCROLL FOR NEXT