high court. 
मुंबई

सेफ्टी किटशिवाय सफाई कामगारांची सुरक्षा कशी ? न्यायालयाचा महापालिकेला सवाल

सकाळवृत्तसेवा

मुंबई : नवी मुंबईतील हजारो सफाई कामगार कोरोनाचा संसर्ग सुरू असताना सेफ्टी किटशिवाय काम कसे करतात, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबई महापालिकेला विचारला आहे.

कोरोनाचा धोका वाढत असताना आणि लॉकडाऊन सुरू असतानाही सफाई कामगार, कचरा वेचक कामावर हजर आहेत. त्यांना पीपीई किट पुरवणे बंधनकारक आहे. सेफ्टी किटशिवाय ते कसे काम करणार, अशी विचारणा न्या. एस. जे. काथावाला यांनी केली. नवी मुंबई क्षेत्रातील सफाई कामगार संघटने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. सेफ्टी किटमध्ये एन-95 मास्क, सॅनिटायझर, हातमोजे आदी साधनांचा अंतर्भाव असतो. या सेफ्टी किटच्या खरेदीचा तपशील आणि वापराची मुदत याबाबत लेखी माहिती देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले नवी मुंबई महापालिकेला दिले. 

कोरोनाची बाधा
नवी मुंबई महापालिकेने सुरक्षा साधने दिलेली नसतानाही हजारो कर्मचारी सफाईचे काम करत आहेत. आतापर्यंत काही जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 24 हून अधिक जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते, असे याचिकादारांनी नमूद केले आहे.

How to protect cleaner worker without safety kits? read full story

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: न्यूझीलंडच्या सलमीवीरांनी वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकला सामना; स्पर्धेत्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

Video Viral: दुचाकीस्वारासह उचलली गाडी; पुण्यातला टोइंग व्हॅनचा व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष पदावरून युतीत तानातानी?

मनवा नाईक पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या खुर्चीत; 'या' प्रसिद्ध निर्मात्यासोबत मिळून करणार धमाका

Ajit Pawar Plane crash: रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेलांच्या नावाचा उल्लेख का केला? 'त्या' दोन कंपन्यांपैकी एक पटेलांची

SCROLL FOR NEXT